लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते़ काही भागात अतिवृष्टीने शेत जमिनीत पाणी साचून कापसाचे पीक पिवळे पडले़ या पिकाला बोंडातून कोंब फुटू लागले़ सोयाबीनचे पीकही जागेवर मोड फुटत असल्याने नुकसानग्रस्त झाले आहे़ काही भागात ओढे, नाले आणि नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काढून सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या आहेत़ या आसमानी संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात केली़ मागील आठवड्यातील शुक्रवारपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले़ साधारणत: आठ दिवसांच्या कालावधीत सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत़अतिवृष्टी झाल्यानंतर कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ हा आकडा गृहित धरून प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली़ महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागातील कृषी सहाय्यक आणि पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले़ ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ प्रत्यक्षात ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर एवढे क्षेत्र बाधित आहे़ प्राथमिक अंदाजानुसार बाधीत क्षेत्राचा आकडा प्रशासनाने निश्चित केला होता; परंतु, प्रत्यक्ष पंचनामे करीत असताना बाधित क्षेत्र या पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास येत आह़े़ त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अजूनही पंचनाम्यात गुंतले आहेत़ दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे़ त्यमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रत्यक्ष मदतीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा४जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला गती दिली आहे़ अपेक्षित नुकसानग्रस्त भागाचे पंचनामेही पूर्ण केले असून, त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल; परंतु, पैसा हातात येण्याच्या काळातच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे़४सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांतून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग रबी पेरण्यासाठी वापरला जाणार होता़ मात्र आता शेतकºयांच्या हातात पैसा नाही़ त्यामुळे रबीच्या पेरण्या करायच्या कशा? असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे़४ त्यामुळे आगामी काळातील आर्थिक गणिते शासनाच्या मदतीवर अवलंबून असून, शासन किती तत्परतेने शेतकºयांना मदत करते, याकडे जिल्ह्यातील लक्ष लागले आहे़
परभणी : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:46 AM