लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यात दमदार पाऊस पडावा यासाठी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी गोदावरीनदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला सोमवारी दुग्धाभिषेक करून साकडे घातले.पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले तरी अद्याप पर्यंत तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. शेतकरी हवालदिल झाले असून नदी, नाले आजही कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे तालुकावासीयांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती आहे.तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस पडावा यासाठी २२ जुलै रोजी सकाळी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी स्वामी दैठणकर यांच्या हस्ते गोदावरी नदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करीत महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी बालासाहेब सोन्नर, दिगंबर बावळे, महादेवराव पाटील, संतोष सोन्नर, सुदामराव बावळे, त्र्यंबक अप्पा गौरशेटे, प्रभाकर भंडे, लिंगा पवार, मुंजाजी सोन्नर, सुधीर खळीकर, सिध्देश्वर सुरवसे, मंचकराव सोन्नर, उत्तम दसवंते, अमोल सोन्नर, लक्ष्मण खटिंग, पांडुरंग सोन्नर, दादासाहेब पवार, तुकाराम महाराज पुरी, बालाजी कुंढरे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
परभणी : पावसासाठी ग्रामस्थांचा दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:24 AM