लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गावरील दुभाजकावर योग्य ठिकाणी वळण रस्ते सोडले नसल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला हा रस्ता शहरवासियांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.कल्याण ते निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातील गढी- माजलगाव - पाथरी - मानवत - परभणी असा जातो. बीड जिल्ह्यातील गढी ते पाथरी आणि पुढे मानवत रोडपर्यंत या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीला २२२ क्रमांकाचा असलेल्या या रस्त्याचा दर्जा केंद्र शासनाने वाढविला असून, आता या महामार्गाला ६१ क्रमांक मिळाला आहे.राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा या रस्त्याला प्राप्त झाल्याने वाहतूक वाढली आहे. पाथरी शहरातून जाणाºया या महामार्गावर सोनपेठ पॉर्इंटपासून ५०० मीटरवर असलेल्या पोखर्णी फाट्यापर्यंत दुभाजक बसविले आहेत. शहरातील हा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावर बाजारपेठही आहे. तसेच पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक आदी प्रमुख कार्यालयेही या रस्त्यावर असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.शहरी भागात टाकलेल्या दुभाजकावर आवश्यक तेवढे आऊटसोर्स (वळण रस्ते) नसल्याने रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यातच शहरातील रहदारीला शिस्त नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी मोंढा परिसरात याच रस्त्यावर पोलिसांच्याच गाडीला एका कारने वाहनाने धडक दिली. या घटनेनंतर या रस्त्यावरील अपघाताचे गांभिर्य आणखीच वाढले आहे.सेलू कॉर्नर : महामार्गाचे काम ठप्पराष्ट्रीय महामार्गावरील सेलू कॉर्नर परिसरात रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याची जागा या रस्त्यावर आहे. पुतळ्यासाठी जागा सोडून काम सुरू करण्यात आले खरे मात्र; अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या भागातही रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.रस्त्यावरच उतरविला जातोय माल४कल्याण-निर्मल हा राष्टÑीय महामार्ग पाथरी शहरातून गेला असून शहरातील बहुतांश मोठी दुकाने याच रस्त्यावर आहे. किराणा, भुसार माल, तसेच सिमेंट, स्टील उतरविण्यासाठी जड वाहने रस्त्यावर आडवी लावली जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील रहदारीला अधिकच अडथळा निर्माण होत आहे.
परभणी : पाथरीत राष्ट्रीय मार्ग बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:00 AM