लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चारही मतदार संघातील उमेदवारांनी विजया दशमीचा मुहूर्त साधून जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे़ विजया दशमीच्या दिवशी एकही सभा झाली नसली तरी सभांचे नियोजन मात्र करण्यात आले़ सीमोल्लंघनासाठी जमणाºया मतदारांशी संवाद साधून उमेदवारांनी प्रचाराचे पुढचे पाऊल टाकले आहे़विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर राजी जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष जाहीर प्रचार मात्र आजपर्यंत सुरू झाला नाही़ सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणूक लढविणाºया उमेदवारांची संख्या, नावे आणि निवडणूक चिन्ह घोषित झाले़ त्यामुळे प्रचारासाठीचा मार्ग खुला झाला आहे़ योगायोगाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर दुसºयाच दिवशी विजया दशमीचा सण जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला़ या सणाच्या निमित्ताने शहराबाहेरील मैदानांवर, देवी मंदिरांजवळ सीमोल्लंघन करणाºया नागरिकांची गर्दी झाली होती़या गर्दीचा फायदा घेत दसºयाचा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा देत निवडणुकीतील विजयासाठी उमेदवारांनी हाच मुहूर्त साधला़ मंगळवारी अनेक प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आगामी काळातील प्रचाराचे नियोजनही घोषित केले आहे़गावफेºया, कॉर्नर बैठका, कार्यकर्त्यांची जमवा जमव, मतदार यादीचा अभ्यास करण्यात आला असून, किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत आणि या मतदारांशी कशा प्रकारचे संपर्क साधायचा याचे नियोजन करण्यात आले़ त्यामुळे विजया दशमीच्या मुहूर्तावर अनेकांनी विजयाचे संकल्प करीत जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे़जिल्ह्यातील एकाही मतदार संघात अद्याप ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार सुरू झाला नसला तरी बुधवारपासून हा प्रचारही सुरू होईल़ त्यामुळे निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरू लागला आहे़ मंगळवारीही प्रचाराची गती कमी होती़ गावा-गावांत उमेदवारांनी बैठका घेऊन नियोजन केले़ गावातील मतदारांचा अंदाजही बांधला आहे़ त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये जाहीर प्रचाराच्या निमित्ताने रंग भरणार आहेत़राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभेचे नियोजन४या मतदार संघात अद्याप एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा झाली नाही़ प्रचारासाठी आता केवळ १३ दिवस शिल्लक राहिले आहेत़४प्रचाराचा कालावधी कमी असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संपर्क साधण्यासाठी उमेदवारांना थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहचण्यास वेळ लागणार आहे़ ही बाब लक्षात घेऊन जाहीर सभांवरच भर दिला जाणार आहे़४त्यासाठी सर्वच उमेदवारांनी आपल्या पक्षातील स्टार प्रचारकांची सभा मतदार संघात व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़४अनेकांच्या प्रयत्नांनाही यशही आले असून, या सभांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत़ त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचाराला गती द्यावी लागणार आहे़
परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 11:55 PM