लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हरीण जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उमलानाईक तांडा येथे घडली़उमलानाईक तांडा शिवारात सर्वे नंबर ४४ मध्ये शिवाजी उमला राठोड यांच्या शेतात रविवारी कापूस पिकातील तूट भरण्याचे काम सुरू होते़ या शेतापाूसन काही अंतरावर कुत्र्यांनी हरणाच्या कळपावर हल्ला चढविला़ यात एक हरीण गंभीर जखमी झाले़ हरणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून प्रा़ पंडित राठोड, रेणुका राठोड, ज्ञानोबा सुतार, आकाश राठोड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी हरणाच्या दिशेने धाव घेतली़ कुत्र्यांच्या तावडीतून जखमी हरणाला सोडविल़े़ त्यानंतर ही माहिती पोलीस पाटील वंदना राठोड यांना दिली़ उपसरपंच गणेश राठोड, नगरसेवक तुकाराम तांदळे यांच्या मदतीने जखमी हरणाला पोलीस ठाण्यात आणले़ त्यानंतर वन विभागाच्या सीमा राठोड यांना ही माहिती दिली़ गंगाखेड येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात हरणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले़ डॉ़श्रीनिवास कार्ले, मिलिंद गायकवाड, राम मुंडे यांनी प्राथमिक उपचार केले़ मात्र हरणाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास परभणी येथे हलविण्याचे सांगत हे हरीण वन विभागाच्या सीमा राठोड यांच्या ताब्यात देण्यात आले़
परभणी : कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:38 AM