लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़पालम शहरात गंगाखेड रस्त्यालगत शासनाचे तालुका कृषी कार्यालय कार्यरत आहे़ या कार्यालयात मागील तीन वर्षांपासून पूर्णवेळ कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ मध्यंतरी जून महिन्यात तालुका कृषी अधिकारी पद भरण्यात आले होते़ परंतु, संबंधित अधिकाºयाने दोनच महिन्यातच बदली करून घेतल्याने हे पद रिक्त झाले आहे़ या रिक्त पदावर सहा महिने उलटले तरीही पूर्णवेळ अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आलेली नाही़ या ठिकाणचा पदभार गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी मस्के यांना इच्छा नसतानाही बळजबरीने देण्यात आला आहे़ त्यामुळे मस्के महिना महिना पालमच्या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ अतिरिक्त कारभार असल्याने त्यांना सोयरसुतक राहिलेले नाही़ पूर्णवेळ कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने शेतकºयांच्या विविध योजनांची वाताहत सुरू झाली आहे़ यामुळे अनेक योजनांवरून कर्मचारी व शेतकºयांत वाद होत आहेत़ जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे हे नेहमीच पालम तालुक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे जाब विचारावा तरी कोणाला, असा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे उभा आहे़कृषी आयुक्त एस़पी़ सिंह यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी पालम तालुकावासियांतून होत आहे़या योजनांवर होतोय परिणामराज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात़ शेती व्यवसायाबरोबरच जोड व्यवसायासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे़ शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक समृद्धी साधतो़ परंतु, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील स्थिती मात्र वेगळी आहे़ राज्य शासन व कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाºया पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार, तुषार सिंचन, विद्युत मोटार वाटप इ. योजना सध्या सुरू असून, यातून शेतकºयांना लाभ मिळतो़ परंतु, या तालुक्याचा कृषी अधिकारी पदाचा पदभार रिक्त असल्याने या योजनाबाबत ना जनजागृती होते ना लाभ मिळतो़ त्यामुळे पालम तालुक्यासाठी उभारण्यात आलेले तालुका कृषी कार्यालय केवळ शोभेची वास्तू म्हणूनच उभे आहे की काय, असा प्रश्न शेतकºयांतून उपस्थित होत आहे़रिक्त पद भरण्याची मागणी४सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकºयांना व पशुपालकांना चारा, पाणी प्रश्नांसाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे़ परंतु, हे पद प्रभारी असल्याने गंगाखेड येथील तहसीलदार महिना-महिना या कार्यालयाकडे फिरकत नाहीत़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून पालम तालुक्यासाठी कायमस्वरुपी अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे़
परभणी : अधिकाऱ्याअभावी योजनांची वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:57 AM