शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

परभणी : सिंचन विहिरींसाठी साडेचार कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:38 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कुशलची देयके देण्यासाठी ४ कोटी ६२ लाख ८२ हजार ६९५ रुपयांची मागणी रोहयो विभागाने नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे़ त्यामुळे लवकरच ही कामे पूर्णत्वाला जाण्याची आशा निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कुशलची देयके देण्यासाठी ४ कोटी ६२ लाख ८२ हजार ६९५ रुपयांची मागणी रोहयो विभागाने नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे़ त्यामुळे लवकरच ही कामे पूर्णत्वाला जाण्याची आशा निर्माण झाली आहे़रोहयोच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे काम मंजूर केले जाते़ साधारणत: २ लाख ९९ हजार रुपये खर्चातून एक विहीर तयार केली जाते़ यामध्ये कुशल आणि अकुश अशा दोन स्वरुपात देयके अदा केली जातात़ त्यापैकी कुशलची देयके मागील काही वर्षांपासून थकली होती़ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विहीर बांधकाम केल्यानंतर या बांधकामासाठी झालेला साहित्याचा खर्च आणि बांधकामाचा खर्च देण्यासाठी कुशलची देयके अदा केली जातात़ प्रत्येक तालुक्यात सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात येते़ त्यामुळे विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर विहीर बांधकाम करूनही लाभार्थ्यांना त्याची रक्कम प्राप्त होत नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागत असे़ या संदर्भात रोजगार हमी योजना विभागाने जिल्हा परिषदेकडून पूर्ण झालेल्या सिंचन विहिरींच्या देयकांची मागणी नोंदविली़ त्यात ६ तालुक्यांनी रोहयोकडे निधीची मागणी केली आहे़ त्यानुसार निधी मागविण्यात आला आहे़जिंतूर तालुक्यात सिंचन विहिरीच्या कुशल देयकांसाठी २४ लाख २६ हजार, मानवत तालुक्याने ७० लाख ८४ हजार ८३१, पालम तालुक्याने ५८ लाख ७४ हजार १७२, पाथरी ३० लाख ४७ हजार १०९, पूर्णा १ कोटी ७७ लाख २ हजार ५३६ आणि सेलू तालुक्यासाठी १ कोटी १ लाख ४८ हजार ४७ रुपयांचा निधी मागविला आहे़त्यानुसार रोजगार हमी योजना विभागाने ४ कोटी ६२ लाख ८२ हजार ६९५ रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ हा सर्व निधी येत्या आठ दिवसांमध्ये रोजगार हमी योजना विभागाला प्राप्त होणार असून, तालुकानिहाय लाभार्थ्यांना रखडलेली देयके वितरित केली जाणार आहेत़डीपीटीद्वारे जमा होणार रक्कमवैयक्तीक लाभाच्या कामासाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने मे २०१८ च्या अध्यादेशानुसार दिली आहेत़ त्यामुळे नोंदविलेली ४ कोटी ६२ लाखांचा निधी आठवडाभरात प्राप्त झाल्यानंतर डीपीटीद्वारे तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़ मनरेगा योजनेत केलेल्या कामांचे कुशल आणि अकुशल अशा दोन टप्प्यात पेमेंट केले जाते़ अकुशलचे पेमेंट थेट मजुरांच्या खात्यावर जमा होते़ तर कुशलच्या पेमेंटसाठी लाभार्थ्यांना बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मनरेगाकडे पाठपुरावा करावा लागतो़ ६० टक्के अकुशल आणि ४० टक्के कुशल या सूत्रांनुसार पेमेंट वितरित केले जाते़ सिंचन विहिरींच्या बांधकामासाठी कुशलसाठी १ लाख ३६ हजार सरासरी पेमेंट प्रति लाभार्थ्याला होत असल्याची माहिती मिळाली़३९५ विहिरींची पूर्ण झाली कामेमागील वर्षभरामध्ये जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरींची ३९५ कामे पूर्ण झाली आहेत़ त्यामध्ये जिंतूर तालुक्यात ५३, मानवत ५९, पालम ३७, पाथरी २४, पूर्णा १४१ आणि सेलू तालुक्यातील ८१ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ त्यामुळे या विहिरींच्या कुशलच्या देयकांपोटी आता लाभार्थ्यांना निधी प्राप्त होणार आहे़रस्त्यांसाठी पावणेतीन कोटींचा निधीजिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामासाठी निधी मागविण्यात आला आहे़ दुसरीकडे पूर्णा तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते आणि विहिरी पुनर्भरणाची २४ कामे पूर्ण झाली आहेत़ या कामांच्या देयकासाठी २७ लाख ९० हजार ८०४ रुपयांचा निधी जिल्हा परिषदेचे रोहयोकडे मागविला आहे़ त्यानुसार रोजगार हमी विभागाने या निधीची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प