अतुल शहाणे।लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): जालना ते नगरसोल या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या डेमू रेल्वेच्या दुरुस्तीची कामे आता पूर्णा रेल्वे स्थानक परिसरात नव्याने स्थापन केलेल्या वर्कशॉपमध्ये होणार आहे. त्यामुळे पूर्णा रेल्वेस्थानकाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.जालना ते नगरसोल या मार्गावर दररोज डेमू रेल्वेगाडी धावते. आठवड्यातून एकवेळा या रेल्वे गाडीची दुरुस्ती व तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी प्रत्येक आठवड्यात रविवारी सुमारे ४५० कि.मी. अंतरावर असलेल्या सिकंदराबाद जिल्ह्यातील मौलाली येथे या गाडीची दुरुस्ती केली जात होती. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात डेमू रेल्वेगाडीला ९०० कि.मी. अंतराचा प्रवास विनाप्रवासी करावा लागत होता. यातून रेल्वे प्रशासनाचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता.पूर्णा येथे डेमू रेल्वे गाडीचे दुरुस्ती केंद्र सुरु करावे, अशी जुनी मागणी होती. पूर्णेत हे केंद्र सुरु झाले तर रेल्वे प्रशासनाच्या खर्चात बचत होणार होती. ही मागणी लक्षात घेऊन दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने पूर्णा येथे डेमू रेल्वेगाडीचे दुरुस्ती केंद्र सुरु करण्यास मंजुरी दिली असून शनिवारी या वर्कशॉपचे प्रत्यक्ष उद्घाटनही करण्यात आले आहे. नांदेड विभागाचे विभागीय वरिष्ठ अधिकारी मंगचार्यलू यांच्या उपस्थितीत वर्कशॉपचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आठवड्यातून एकवेळा आता पूर्णा येथे डेमू रेल्वेची दुरुस्ती केली जाणार आहे.रेल्वे प्रशासन : वेळ व खर्चाची बचत४या रेल्वेगाडीच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक आठवड्यात जालना ते मौलाली असा बिनकामी प्रवास या रेल्वेगाडीला करावा लागत होता. पूर्णा येथे मालगाड्यांची किरकोळ दुरुस्ती करण्याचे काम वर्कशॉप पूर्वीपासूनच कार्यरत आहे.४या वर्कशॉपमध्ये डेमू रेल्वेची दुरुस्ती होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन रेल्वे विभागाने डेमू रेल्वेसाठी पूर्णा येथे वर्कशॉप सुरु केल्याची माहिती मिळाली. या वर्कशॉपमुळे रेल्वेखात्याचा वेळ आणि नाहक खर्च वाचणार आहे.रेल्वे मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी प्रतीक्षाच४नांदेड विभागामध्ये रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असून पूर्णा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजुचे भरण सुरु आहे. मिरखेल ते पूर्णा मार्गावर रेल्वे रुळाचे काम गणपूर, खुजडा शिवारापर्यंत पोहचले आहे.४पूर्णा ते चुडावा तसेच चुडावा ते लिंबगाव या भागातही रुळ अंथरण्याचे काम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पातील मोठी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष दुहेरीमार्गावरुन वाहतूक होण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.गाड्या वाढण्याची शक्यता४पूर्णा- अकोला, पूर्णा- परळी आणि पूर्णा- औरंगाबाद या मार्गावर पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. सिकंदराबाद विभागात डेमू गाड्या मोठ्या प्रमाणात धावतात.४पूर्णा येथे दुरुस्ती केंद्र सुरु केल्याने सुविधांमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करणे आवश्यक असून नांदेड विभागातून जादा डेमू गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.
परभणी : पूर्णेत होणार डेमू रेल्वेची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:20 AM