लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना पत्र पाठवून परभणीतून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. या लेटर बॉम्बमध्ये जिल्हाधिकाºयांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या पत्राने खळबळ उडाली आहे.डॉ.संजय कुंडेटकर हे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन विभागामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. ५ नोव्हेंबर रोजी कुंडेटकर यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून होणारी घुसमट त्यांच्याकडे व्यक्त केली आणि वारंवार होणाºया आपमानामुळे परभणी येथून कार्यमुक्त करावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. कुंडेटकर यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, फेब्रुवारी २०१८ पासून माझ्यासोबत अपमानास्पद वागणूक होत असल्याचे दिसत आहे. २७ डिसेंबर २०१७ ते ६ फेब्रुवारी २०१८ या काळात गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना ३ किंवा ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांनी गंगाखेड येथे भेट दिली. त्यावेळी दोन मोबाईल, वाहतुकीच्या पावत्या आणि काही चाव्या देऊन काय आहे, ते बघा, अशा तोंडी सूचना दिल्या होत्या. त्यावर चौकशी केली असता तहसील कार्यालयात लावलेल्या दोन्ही ट्रक मालकांकडे वाळूच्या रितसर पावत्या आढळल्या. तसेच चौकशी केली असता संशयास्पद काहीही आढळले नाही. त्यामुळे ट्रकचालकाला समज देऊन सोडून देण्यात आले. या प्रकारानंतर तडकाफडकी माझ्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. तसेच ट्रक चालकाकडून दंड वसूल करण्याच्या सूचना मला दिल्या. या प्रकरावरुन वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्याचप्रमाणे गोपनिय अहवाल सादर करतानाही अपमानास्पद वागणूक देऊन कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्याचप्रमाणे कामानिमित्त औरंगाबाद येथील खंडपीठात जाण्यासंदर्भात अर्ज दिल्यानंतरही यापूर्वी मला माहिती दिली नसल्याचा शेरा लावत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. पुणे येथे प्रशिक्षणासाठी जाण्याचा अर्ज केल्यानंतरही याच पद्धतीने शेरा देऊन कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. जिल्हाधिकाºयांकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे कुंडेटकर यांनी या पत्रात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी प्रत्येक बैठकींमध्ये अधिकाºयांसमोर अपमान करतात. या सर्व प्रकारामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असून कौटुंबिक नातेसंबंधावरही परिणाम होत आहे. यातून कार्यालयीन शिस्तीचा व शिष्टाचाराचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मला परभणी येथून तात्काळ कार्यमुक्त करावे, असेही या पत्रात म्हटले आहे. उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाºयाने पाठविलेल्या या पत्रात जिल्हाधिकाºयांवरच आरोप केले असल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेतन आडविले गेल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही कुंडेटकर यांनी स्पष्ट केले आहे. या पत्राच्या प्रति मंत्रालयातील महसूल विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्तांनाही पाठविल्या आहेत.गुगल कॅलेंडरमध्ये मागविली दैनंदिनी४डॉ.कुंडेटकर यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात गुगल कॅलेंडर दैनंदिनीचाही उल्लेख केला आहे. २३ आॅगस्ट २०१८ पासून बायोमॅट्रिक प्रणालीमध्ये व्यवस्थित नोंद करीत नसल्याचे कारण देत माझ्या दैनंदिन कार्याची नोंद गुगल कॅलेंडरमध्ये करावी, असे सूचित करण्यात आले.४मे ते आॅगस्ट २०१८ या काळात बायोमॅट्रिक कार्यप्रणालीतील नोंदीचे सक्षम पुरावे दिले असतानाही गुगल कॅलेंडरमध्येच नोंद करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे कंत्राटी कामगारांकडून वर्ग १ च्या अधिकाºयाची गुगल कॅलेंडरमध्ये नोंद करुन घेणे उचित नसतानाही तसे आदेश देण्यात आले.४तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आपणालाच गुगल कॅलेंडरची सक्ती लागू केल्याची खंतही त्यांनी या पत्रात नमूद केली आहे. या उपरही १ नोव्हेंबर रोजी आॅक्टोबर २०१८ पर्यंतची गुगल कॅलेंडरमधील दैनंदिनी सादर केल्यानंतर दररोज किती टपाल बघितले, त्याची संख्या, रोज किती अभ्यागतांच्या भेटी घेतल्या, त्याची संख्या तसेच कामाच्या तासांमध्ये रिकामा वेळ राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. या सर्व प्रकारावरुन जिल्हाधिकारी आपल्याला जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देत असल्याचे स्पष्ट होते, असेही या पत्रात म्हटले आहे.४उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून आपली घुसमट व्यक्त केल्यानंतर या प्रकरणी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना शनिवारी सकाळी ११.५७ वाजण्याच्या सुमारास दोन वेळा संपर्क केला. मात्र त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
परभणी : जिल्हाधिकाऱ्यांवर उपजिल्हाधिकाºयांचा ‘लेटर बॉम्ब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:35 AM