लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यात संगणक परिचालक यांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचायत समित्यांचा कारभार विस्कळीत झाला होता.संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळ नियुक्ती द्यावी, संगणक परिचालकांचा पगार चौदाव्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून द्यावा, परिचालकांचे थकीत मानधन अदा करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून संगणक परिचालक यांनी आंदोलनाला प्रारंभ केला.या आंदोलनात संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, जिल्हाध्यक्ष वैभव एक्केवार, शरद वैरागर, पंढरीनाथ इक्कर, विजय शिंदे, सुरेश मोरे यांच्यासह संगणक परिचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाभरात ४२३ संगणक परिचालकांना आंदोलनात सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.मानवतमध्ये आंदोलन४मानवत : तालुक्यातील ४९ ग्रामपंचातीच्या संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ संगणक परिचालकांचे थकित वेतन द्यावे, शासन सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.४या आंदोलनात तालुकाध्यक्ष दत्ता पुरी, संतोष कापसे, महादेव शिंदे, विकास झेंडे, रमेश वाघ, संतोष यादव, ज्ञानेश्वर मस्के, शंकर चव्हाण, बापुसाहेब कदम, राम शिंदे, राजाराम भोरकडे, प्रशांत जाधव, गोपाळ होगे, आसाराम भोकरे, महेश कदम, विकास लाडाणे, विकास तुपसुंदरे, सर्जेराव शिंदे, संतोष नारळे आदी सहभागी झाले होते.परभणीत बेमुदत काम बंद आंदोलन४संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासूच परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हास्तरावर संगणक परिचालक म्हणून काम करणाºया परिचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.४या परिचालकांना एक-एक वर्षापासून मानधन मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मानधन दिले जात नाही. सध्या आॅनलाईनची कामे वाढली असून प्रत्येक ग्रामपंचायतीत कायमस्वरुपी संगणक परिचालकाची नियुक्ती करणे आवश्यक असताना शासन बोगस कंपन्यांची नियुक्ती करुन त्या माध्यमातून संगणक परिचालकांचे वेतन दिले जाते. या सर्व प्रश्नांमुळे आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
परभणी : संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:06 AM