शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:18 AM

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला. तालुक्यातील ग्रामीण भागातील समाज बांधव परभणीत दाखल झाले होते. काठी, घोंगडी आणि डोक्यावर पिवळा पटका बांधून पारंपारिक वेषात काही समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सुरेश भूमरे, मारोतराव बनसोडे, टी.टी.सुभेदार, कठाळू शेळके आदींनी आपल्या भाषणांमधून समाजाला आरक्षणाची नितांत आवश्यकता असताना शासन वेळकाढू धोरण अवलंब असल्याचा आरोप करीत एस.टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनावर सुरेश भूमरे, मारोतराव बनसोडे, गणेश मिरासे, विलास लुबाळे, प्रा.तुकाराम साठे, अनंतराव कोरडे, दीपक शेंद्रे, गजानन चोपडे, विष्णू बोरचाटे, गजानन जोरवर आदींची नावे आहेत.ल्लगंगाखेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादगंगाखेड- येथील तहसील कार्यालयासमोर पारंपारिक वेषभूषेत आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाऊसाहेब कुकडे, जयदेव मिसे, जितेश मोरे, हनुमान देवकते, कैलास रबदडे, शिवाजी बोबडे, सदाशीव कुंडगीर, माधव शेंडगे, सखाराम बोबडे, रुखमाजी लवटे, भगवान बंडगर, माऊली ठेंबरे, संदीप आळनुरे, गजानन देवकते आदींची नावे आहेत. दरम्यान, भाजपाचे रामप्रभू मुंडे, रासपचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.ल्लपाथरीत मोर्चापाथरी- धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाथरीत २७ आॅगस्ट रोजी पाथरी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. शहरातील अहिल्यानगर येथून सुरु झालेला मोर्चा राष्ट्रीय महामार्गाने कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कॉर्नरमार्गे तहसीलवर पोहचला. या ठिकाणी अनेकांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी दत्तात्रय मायंदळ, रमेशराव सोनटक्के, बळीराम नवघरे, डिगंबर ताल्डे, बाबासाहेब दुगाणे, राजेभाऊ हिंगे, नितीन दुगाणे, दिलीप धरपडे, दत्तराव नेमाणे, माऊली नेमाणे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालममध्ये आंदोलनपालम- येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ढोल जागर आंदोलन करण्यात आले. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरापासून धनगर समाज बांधवांनी रॅली काढली. ही रॅली नवामोंढा, मुख्य चौक बसस्थानकमार्गे तहसील कार्यालयावर धडकली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसील समोर सरकारला इशारा देत ढोल वाजवून गजर करण्यात आला. यावेळी गणेश घोरपडे, भागवत बाजगीर, विजय घोरपडे, चंद्रकांत ताठे, नरहरी घोरपडे, माऊली घोरपडे, दत्ता घोरपडे, नारायण अडकिणे, शंकर वाघमारे, सर्जेराव धुळगुंडे, गोपाळ देवकते, रामचंद्र काळे, अशोक लवटे, साहेब सुरनर, आत्माराम सोडनर, मुंजाजी आव्हाड, बबन जेडगे, शेंगुळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सोनपेठमध्ये ढोल जागरसोनपेठ- येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी ढोल- जागर आंदोलन केले. नायब तहसीलदार डॉ.निकेतन काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर दिनकर तिथे, प्रकाश देवकते, वैजनाथ डोणे, नितीन सावंत, पिंटू आळसे, अशोक मुळे, राजाभाऊ निळे, रामेश्वर आळसे, माणिक आळसे, बालाजी धोत्रे, अशोक पुंजारे, शुभम डोणे आदींची नावे आहेत.जिंतूर शहरात धनगर समाजाचे आंदोलनजिंतूर- जिंतूर येथेही शासकीय विश्रामगृहावर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनात प्रा.डॉ.प्रभाकर वजीर, अनंतराव कोरडे, दीपक शेंद्रे, कुबेर हुलगुंडे, प्रकाश शेवाळे, अर्जून वजीर, मनोज शिंपले, भारत शेवाळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नायब तहसीलदार जी.आर.गावंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.प्रभाकर वजीर यांनी मार्गदर्शन करीत ३१ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणाºया मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ धनवटे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अमोल आव्हाड, दीपक खताळ, संजय शिंपले, नारायण जगाडे, उत्तम शिंपले, सतीश ताल्डे, डिगंबर जावळे, रुस्तुम गडदे, अंबादास धनवटे, गजानन पावडे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीreservationआरक्षणagitationआंदोलन