लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले.शुक्रवारी सकाळपासूनच रंगांचा हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली. लहान मुलांपासून ते युवक, महिला ठिकठिकाणी रंगांची उधळण करीत या उत्सवात सहभागी झाले. यावर्षी जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवसभर बहुतांश ठिकाणी पाण्याचा अपव्यय झाला नसल्याचे दिसून आले. लहान मुले वगळता सर्वांनीच कोरड्या रंगांना पसंती देत हा उत्सव साजरा केला. धुलीवंदनानिमित्त सुटी असल्याने सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. शहराबाहेरुन येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी पोलिसांनी केली. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सनी मित्रमंडळाचा उपक्रम४येथील नवा मोंढा भागात सनी मित्र मंडळाने इको फ्रेंडली धुलीवंदन साजरे केले. मित्र मंडळाचे सुनील अग्रवाल यांनी राधाकृष्ण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला.मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील कचरा जाळून होळी प्रज्ज्वलित करण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी नैसर्गिक रंगांचा वापर करुन धुलीवंदन साजरे करण्यात आले. यावेळी किशोर शर्मा, नितीन दरक, आशिष भंडारी, गोकुल दाड, दिलीप भट्टड, कैलास सारडा, महेश मालपाणी, निलेश मंत्री, पुरुषोत्तम दरक, रितेश जैन, सचिन तापडिया, सुशिल सोमाणी, डॉ.किशोर सोनी, श्रीहंस जैन, राजेश शहा, दीपक बंग, श्याम मुरक्या, घनश्याम भंडारी, पवन बंग, गोपाल दायमा, बालाजी जोश, श्याम झंवर, विजय आसेगावकर, विजय मुंदडा, पवन सारडा आदींची उपस्थिती होती.विश्वनाथ कॉलनी४विश्वनाथ कॉलनीतही पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करण्यात आले. कार्यक्रमास उन्नती नांदे, धनश्री बोगार, अनुप्रिया विभुते, आकांक्षा गायकवाड, वैष्णवी आळसे, माहेश्वरी जाधव, साक्षी आळसे, सृष्टी शिंदे, शर्वरी काळे, वैष्णवी भवर, श्रद्धा शिंदे, आरती राऊत, वैष्णवी अवचार, सृष्टी काळे, श्रद्धा लाहोरकर आदींनी सहकार्य केले.धुलीवंदन उत्साहात४परभणी- येथील तिरुपतीनगरात होळी व धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. परिसरातील कचरा जमा करुन त्याची होळी प्रज्वलित करण्यात आली. तसेच पर्यावरण पूरक रंग खेळण्यात आले. सुरज चांदणे, गोपाळ राऊत, अक्षय पेंडकर, वैभव आळसे, मनोज चांदणे, ओंकार शेटे, कुणाल काळे, अथर्व शेटे, सुरज भारती आदींनी सहकार्य केले.
परभणी:पर्यावरणपूरक रंगांनी साजरे केले धुलीवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:14 AM