लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरापासून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांची ने- आण करणाऱ्या एस.टी. महामंडळाला जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे मोठा फटका बसत आहे. केवळ खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त बसेससह डिझेलच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन ग्रामीण भागातील प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एस.टी. महामंडळाची लालपरी नव्या रुपात आज रस्त्यावरुन धावत आहे. आधुनिक युगानुसार एस.टी. महामंडळाने आपल्या बसेसचे रुपडेही पालटले आहे. काही दिवसांपूर्वी शिवशाही, निमआराम आदी बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केल्या आहेत. सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एस.टी. महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. प्रवाशांना आपल्या परिसरातून बस मिळण्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिंतूर, पाथरी, परभणी व गंगाखेड या चार ठिकाणी आगार स्थापन करण्यात आले आहेत. या आगारातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बस पोहोचविण्याचे काम करण्यात येते; परंतु, मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील रस्ते खराब झाल्याने एस.टी. महामंडळाला याचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. परभणी-गंगाखेड, जिंतूर- परभणी, परभणी- वसमत आणि पाथरी- परभणी या चारही महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मुख्य २० रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे एस.टी. महामंडळाच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक डिझेलच्या खर्चामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर बसेस नादुरुस्त होणे, टायर लवकर खराब होणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एरव्ही १ लाख कि.मी. प्रवासासाठी ५ टायर लागत होते; परंतु, त्याच बसला आता ६ टायर बदलावे लागत आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला रस्त्यांच्या दुरावस्थेचा मोठा फटका बसत असल्याचे यंत्र अभियंता नगरसाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.२४ बस भंगारमध्ये४परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारातून २४ तास प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत; परंतु, काही बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत. या बसेसची दुरुस्ती चारही आगारातील दुरुस्ती विभागातून करण्यात येते. ज्या बसेसची दुरुस्ती आगारात होत नाही. त्या बसेस विभागीय नियंत्रक कार्यालयातील यंत्र विभागाकडे पाठविण्यात येतात.४याही ठिकाणी ज्या बसेस दुरुस्त होत नाहीत, अशा परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया परभणी व हिंगोली या सात आगारातील २४ बसेस एस.टी. महामंडळ प्रशासनाने भंगारामध्ये काढल्याची माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली.
परभणी : खराब रस्त्यांमुळे डिझेल खर्चात २५ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:30 AM