लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी पुर्णा तालुक्यातील कलमुला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमुला ते चांगेफळ अशी पायी दिंडी काढली.मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे यावर्षी तरी चांगला पाऊस होऊन नुकसान भरून निघेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत तरी शेतकºयांना दिलासा मिळाला नाही. एक महिन्यापासून शेतकरी पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जून महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात मान्सून लांबल्याने आज-उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र मान्सून दाखल होऊन १५ दिवस झाले तरीही परभणी जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. शेतकºयांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत करून ठेवली आहे. काही भागात धोका पत्कारत धूळ पेरणी करण्यात आली. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे या शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते की, काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कलमुलातील महिलांनी पावसासाठी काढली दिंडी४आलेगाव- कलमूला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमूला ते चांगेफळ पायी दिंडी काढून पावसासाठी देवाला साकडे घातले.४आलेगाव परिसरात पाऊस होत नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. या भागात बहुतांश ग्रामस्थांचा शेती हाच व्यवसाय आहे. पाऊस पडावा म्हणून आता देवाला साकडे घातले जात आहेत. त्यातूनच कलमूला येथील २५ ते ३० महिलांनी गुुरुवारी कलमूला ते चांगेफळ अशी १० कि.मी. अंतराची पायी दिंडी काढली. दत्तात्रयाच्या भजनांचे गायन करीत या महिलांनी चांगेफळ गाठले. या ठिकाणी मंदिरात जाऊन देवाला पावसाचे साकडे घातले.एक महिन्यात ७८ मि.मी. पाऊस४१ ते ३० जून या एक महिन्यामध्ये जिल्ह्यात केवळ ७८.९६ मि.मी. पाऊस झाला आहे. महिनाभरात १२६.६१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित पावसाच्या ६२ टक्केच पाऊस झाला आहे.४जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यामध्ये सर्वाधिक ९७.२५ मि. मी. पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत या तालुक्यात ९१ टक्के पाऊस झाला. मानवत तालुक्यात १०५.६७ मि.मी. पाऊस झाला असला तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ८७ टक्के पाऊस या तालुक्यात नोंद झाला आहे.४पूर्णा तालुक्यात ८९.६० मि.मी., जिंतूर तालुक्यात ८४ मि.मी., परभणी ७१.७५ मि.मी., पूर्णा तालुक्यात ८९.६० मि.मी. , सोनपेठ ८७.५० मि.मी., जिंतूर ८४ मि.मी., पाथरी ६० मि.मी., पालम ५८.६७ मि.मी., परभणी ७१.७५ मि.मी. आणि सेलू तालुक्यात ५६.२० मि.मी. पाऊस झाला आहे.
परभणी: पावसासाठी पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:16 PM