लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ५३ कोटी ७७ लाख २२ हजार ८८ रुपयांचा निधी ३० जानेवारी रोजी ६ तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शासनाचे दुष्काळी अनुदान प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यातच गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे मदत देण्याची घोषणा शासनाने केली होती. परभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी २६२ कोटी ५६ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली होती. त्यापैकी १०७ कोटी ५४ लाख ४५ हजार ७६ रुपयांना शासनाने मंजुरी दिली असून ही रक्कम जिल्ह्याला दोन टप्प्यात मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याची रक्कम ५३ कोटी ७७ लाख २२ हजार ८८ रुपये मंजूर झाली असून काही दिवसांपूर्वी ही रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी ६ तालुक्यातील शेतकºयांसाठी ही रक्कम तहसीलदारांच्या खात्यावर अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली आहे. हा निधी ज्या प्रयोजनासाठी वितरित केला आहे, त्याच प्रायोजनासाठी वितरित करावा. वितरित केलेल्या अनुदानातून काही रक्कम खर्ची पडणार नसेल तर ती जिल्हाधिकारी कार्यालयात परत करावी, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.सहा तालुक्यांना वितरित केलेला निधी४प्राप्त झालेल्या अनुदानातून जिल्ह्यातील ६ तालुक्यांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. परभणी तालुक्याला १६ कोटी ३५ हजार, पालम तालुक्यासाठी ६ कोटी ६८ लाख १२ हजार, पाथरी तालुक्यासाठी ७ कोटी २३ लाख ५९ हजार, मानवत तालुक्यासाठी ७ कोटी ३५ लाख २४ हजार, सोनपेठ तालुक्यासाठी ६ कोटी २ लाख ८५ हजार आणि सेलू तालुक्यासाठी १० कोटी ४७ लाख ७ हजार ८८ रुपये वितरित करण्यात आले आहेत.३ हजार ४०० रुपयांप्रमाणे वाटपदुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान मंजूर केले आहे. प्राप्त झालेले पहिल्या टप्प्यातील अनुदान जास्तीत जास्त शेतकºयांपर्यंत पोहचावे, या उद्देशाने शेतकºयांच्या खात्यावर अर्धे अनुदान या टप्प्यातून जमा केले जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या ५३ कोटी ७७ लाख रुपयांतून प्रति शेतकरी प्रति हेक्टरी ३ हजार ४०० रुपये या प्रमाणे अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती मिळाली. तसेच ही रक्कम जमा करीत असताना लगतचे नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्यक अनुदान अद्याक्षर ए ते झेड आणि झेड ते ए असे वाटप केले असल्यास हे अनुदान अनुक्रमे झेड ते ए व ए ते झेड अशा पद्धतीने वाटप करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.
परभणी :दुष्काळी मदतीचे ५३ कोटी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:58 AM