लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :परभणी- भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी शनिवारपासून येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात असून, या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे़४ ते १३ जानेवारी या काळात ही भरती प्रक्रिया होणार आहे़ या सैन्य भरतीसाठी आॅनलाईन प्रवेश पत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनाच प्रत्यक्ष मैदानावर प्रवेश दिला जाणार आहे़ प्रवेश पत्रावरील नोंदीनुसार उमदेवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ सैन्य भरती कार्यालय व जिल्हा प्रशासनाने भरतीविषयक तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी दिली़ सैन्य भरतीनिमित्त नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली़ यावेळी जमवाल यांनी वरील माहिती दिली़ बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते़ जमवाल म्हणाले, जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित केला आहे़ यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांच्या नोंदणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ ही भरती प्रक्रिया संपूर्णत: पारदर्शक राहणार असून, संगणकीकरणाद्वारेच प्रक्रिया पार पाडली जाणार आहे़ त्यामुळे दलालांकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषांना उमदेवारांनी बळी पडू नये़ जास्तीत जास्त सुदृढ, चपळ आणि चांगले प्रकृतीमान असलेले उमेदवारच निवडले जाणार असल्याचे जमवाल यांनी सांगितले़ बैठकीस एस़टी महामंडळ, रेल्वे, विद्यापीठ, अग्नीशमन यंत्रणा, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते़६५ हजार उमेदवारांची नोंदणी४परभणी येथे ४ ते १३ जानेवारी या काळात होणाºया भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत ९ जिल्ह्यांमधून ६५ हजार उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ परभणी जिल्ह्यासह राज्यातील ९ जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे़४परभणी जिल्ह्यातून ४ हजार ५०९ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमेदवार दाखल होण्याची शक्यता आहे़४या काळात परभणी जिल्ह्याला जोडणारी वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढविण्याचेही प्रयत्न करण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे शहरामध्ये दाखल होणाºया उमेदवारांची विद्यापीठ परिसरात निवास व्यवस्थाही करण्यात आली आहे़
परभणी : सैन्य भरतीसाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:55 PM