लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ३१ आॅगस्टपर्यंत ८०० कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांकडून मिळाली़जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षांत अपुरा पाऊस झाला़ परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ त्यामुळे रबी व खरीप हंगामात जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली़ तसेच २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षांत जिल्ह्यात काही भागात अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले़ या चार वर्षांत शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला़२०१५-१६ या खरीप हंगामात शेतकºयांना बियाणे खरेदीसाठी पैसे उपलब्ध नव्हते़ त्यामुळे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांवर शेतकºयांची भिस्त होती़ संकटात सापडलेल्या शेतकºयांना बँकांनीही मदतीचा हात दिला़ गतवर्षी तर जिल्ह्यात १६३४ कोटींचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज वाटप करण्यात आले़ त्यामुळे पेरणीसाठी शेतकºयांकडे पैसा उपलब्ध झाला़२०१६ च्या खरीप हंगामात शेतकºयांना चांगले उत्पादन झाले़; परंतु, मालाची आवक वाढल्याने व्यापाºयांनी हा माल कवडीमोल दराने खरेदी केला़ त्यामुळे उत्पन्न होवूनही बँकांकडून घेतलेले पीक कर्ज शेतकरी फेडू शकले नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले़बँकांकडून कर्ज पुरवठा देण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना टाळाटाळ होत होती़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागला़त्यामुळे राज्य शासनाने २८ जून २०१७ रोजी एका शासन आदेशानुसार शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंमलात आणली़ या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दीड लाख रुपयापर्यंत शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली़ त्यानुसार ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ८०० कोटी ७७ लाख ३४ हजार ३४९ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे़जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी मात्र अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत़कर्जमाफीची शेतकºयांना मिळेना माहितीराज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ५४३ शेतकºयांना ८०० कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी ३१ आॅगस्टपर्यंत दिली आहे; परंतु, या कर्जमाफीची बहुतांश शेतकºयांना अद्यापही माहिती मिळालेली नाही़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने केवळ कागदोपत्री आकडे दाखवून कर्जमाफी झाल्याचे सांगितले जात आहे़मात्र ज्या शेतकºयांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, त्यांना माहिती मिळत नाही़ त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज आहे़ एखादा शेतकरी बँकेकडे नवीन पीककर्ज मागणीसाठी गेला तर त्याला कर्जमाफी झाली नसल्याचे सांगण्यात येते व ज्या शेतकºयांना कर्जमाफी झाली आहे, त्या शेतकºयांना काही तरी पैसे भरण्याची मागणी होत आहे़त्यामुळे या कर्जमाफीबद्दल जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे़ यामुळे जिल्हा प्रशासन, त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालय व बँक प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात किती शेतकºयांना कर्जमाफी झाली? त्यांची नावे? ती किती झाली? व किती बाकी आहे? याची माहिती कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे़अशी प्राप्त झाली : कर्जमाफीची रक्कमछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योनजेंतर्गत अलहाबाद बँकेतील २ हजार २२१ शेतकºयांचे कर्जमाफीचे १५ कोटी ५० लाख ४५ हजार २६२ रुपये बँकेला प्राप्त झाले आहेत़ आंध्रा बँकेतील १ हजार २८१ शेतकºयांना ५ कोटी ९८ लाख २३ हजार ३४ रुपये, बँक आॅफ बडोदातील १ हजार ६७१ शेतकºयांसाठी ११ कोटी ८४ लाख ५८ हजार ८८९ रुपये, बँक आॅफ इंडियामधील १७०० खातेदार शेतकºयांसाठी ११ कोटी ६० लाख ७४ हजार ४३६, बँक आॅफ महाराष्ट्रतील ८ हजार ९५५ शेतकºयांसाठी ४९ कोटी ८० लाख ५० हजार ८४८ रुपये, कॅनरा बँकेतील ९४२ शेतकºयांसाठी ८ कोटी ३४ लाख ४८१ रुपये, सेंट्रल बँक आॅफ इंडियातील ६२२ शेतकºयांसाठी ३ कोटी ८० लाख ६ हजार १७९, देना बँकेतील १३७५ शेतकºयांसाठी ९ कोटी ३४ लाख ५८ हजार १४२, आयडीबीआय बँकेतील ३०६ ग्राहकांसाठी १४ कोटी ३२ लाख ५ हजार ७०८ रुपये, इंडियन ओव्हरसीस बँकेतील ३३८ शेतकºयांसाठी १ कोटी ९९ लाख ९९ हजार २३६ रुपये, पंजाब नॅशनल बँकेतील १५१ शेतकºयांसाठी ८४ लाख ४ हजार ८५७ रुपये, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेतील ७३ हजार ४२६ शेतकºयांसाठी ५१५ कोटी ६७ लाख ५५ हजार ७०७ रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले़ महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील १८ हजार ७४६ शेतकºयांसाठी १११ कोटी २३ लाख ९६ हजार ९५७ रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २७ हजार २३२ शेतकºयांसाठी ३९ कोटी ७८ हजार ४५० रुपयांची कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे़
परभणी जिल्हा : दीड लाख शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:37 AM