शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

परभणी जिल्ह्यात युवा मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:48 PM

जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारांनी जिल्ह्यात प्रचार फेऱ्यांना सुरुवात केली आहे़ राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत़ दुसरीकडे जिल्ह्यातील मतदार यादीचे अवलोकन केले असता, युवा मतदारांची संख्या निम्म्यापर्यंत पोहचल्याचे दिसते़जिल्ह्यामध्ये एकूण १३ लाख ९८ हजार २७७ मतदार असून, त्यापैकी ६ लाख ७९ हजार ३८२ मतदार हे १८ ते ३९ वर्ष वयोगटातील आहेत़ त्यामुळे या मतदारांचे विचार, जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांचे प्रश्न, शिक्षणाबरोबरच रोजगार, औद्योगिक विकास या प्रश्नांवर उमेदवारांकडून ठोस आश्वासनांची अपेक्षा या मतदारांना आहे़ जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत १८ ते १९ या वयोगटात ३३ हजार १०६, २१ ते २९ वर्ष वयोगटातील ३ लाख ३४ हजार ९६९ आणि ३० ते ३९ वर्ष वयोगटात ३ लाख १२ हजार ३०७ मतदार आहेत़३९ वर्षे वयापर्यंतच्या मतदारांची एकूण संख्या ६ लाखांच्या घरात आहे़ त्या तुलनेत ३९ वर्षांच्या पुढे मतदारांची संख्या कमी आहे़ या युवा मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटात २१ हजार १६८ पुरुष आणि ११ हजार ९३६ महिला मतदारांचा समावेश आहे़ २० ते २९ या वयोगटातही १ लाख ८६ हजार ४६९ पुरुष आणि १ लाख ४८ हजार ४९३ महिला मतदार आहेत़ तर ३० ते ३९ या वयोगटामध्ये १ लाख ६६ हजार ७५६ पुरुष आणि १ लाख ४५ हजार ५५० महिला मतदारांचा समावेश आहे़या वयोगटातील मतदारांशी संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न सोडविणे यावर उमेदवारांना भर द्यावा लागणार आहे़ युवा वयोगटामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो़ त्यामुळे अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार सुरू केला आहे़ जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार प्रयत्न प्रयत्न करीत आहेत. एकंदर या निवडणुकीत युवकांचा कौल महत्त्वाचा असल्याने युवकांचे मतदान निर्णायक ठरेल, असे दिसते़ज्येष्ठ नागरिकांत महिला मतदार अधिक४जिल्ह्याच्या मतदार यादीत ५० वर्षे वयापर्यंत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे़ मात्र ५० वर्षांच्या पुढील वयोगटात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे़४त्यामध्ये ५० ते ५९ या वयोगटात ९८ हजार ३५४ पुरुष आणि १ लाख २ हजार ७२१ महिला मतदार आहेत़ ७० ते ७९ वयोगटात ३५ हजार ६६७ पुरुष आणि ४० हजार ८५८ महिला मतदार आहेत़ ८० ते ८९ या वयोगटात १५ हजार ९६६ पुरुष तर २३ हजार ३५१ महिला मतदार आहेत़४९० ते ९९ या वयोगटात ३ हजार ६०७ पुरुष तर ५ हजार ७९२ महिला मतदार आहेत़ ९९ वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या गटातही पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे़४जिल्ह्यात ५७१ पुरुष मतदार ९९ पेक्षा अधिक वयाचे आहेत़ तर ९७१ महिला मतदार ९९ वर्षापेक्षा अधिक वयाच्या असल्याचे स्पष्ट होते़२० ते २९ वयोगटात सर्वाधिक मतदार४जिल्ह्याच्या मतदार यादीचे वयोगटनिहाय वर्गीकरण केले असता, या मतदार यादीत २० ते २९ या वयोगटात सर्वाधिक ३ लाख ३४ हजार ९६९ मतदार आहेत़ ३० ते ३९ वयोगटात ३ लाख १२ हजार ३०७, ४० ते ४९ या वयोगटात २ लाख ५५ हजार ६०१, ५० ते ५९ या वयोगटात २ लाख १ हजार ७५ मतदार असून, ६० ते ६९ वयोगटात १ लाख ३४ हजार ४३६ आणि ७० ते ७९ वयोगटात ७६ हजार ५२५ मतदार आहेत़ ८० ते ८९ या वयोगटात ३९ हजार ३१७ तर ९० ते ९९ या वयोगटामध्ये ९ हजर ३७९ मतदार आहेत़दीड हजार मतदार ९९ पेक्षा अधिक वयाचे४जिल्ह्याच्या मतदार यादीत १ हजार ५४२ मतदारांचे वय ९९ वर्षापेक्षा अधिक वयाचे आहे़ त्यात जिंतूर मतदार संघामध्ये १५१ पुरुष, २५३ महिला मतदार ९९ वर्षापेक्षा अधिक वयाच्या आहेत़४परभणी मतदार संघात ७४ पुरुष आणि १३३ महिला, गंगाखेड मतदार संघात १९३ पुरुष आणि ३३६ महिला तर पाथरी विधानसभा मतदारसंघात १५३ पुरुष आणि २४९ महिला मतदार ९९ वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक