लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, त्यात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला आला आहे़ जिल्ह्याचा एकूण निकाल ८९़९० टक्के एवढा लागला आहे़माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यावर्षी परभणी जिल्ह्याने घवघवीत यश संपादन केले आहे़ विभागातील इतर चार जिल्ह्यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे़ ८९़९० टक्के निकालासह परभणी जिल्हा विभागात प्रथम आला असून, औरंगाबाद जिल्हा ८९़१५ टक्के निकालासह दुसऱ्या स्थानावर आहे़ बीड जिल्ह्याचा ८९़०८ टक्के, जालना जिल्ह्याचा ८७़४५ टक्के आणि हिंगोली जिल्ह्याचा ८६़४० टक्के निकाल लागला आहे़यावर्षी परभणी जिल्ह्यामधून २२ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदन पत्र दाखल केले होते़ त्यापैकी २२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे़ यातील २० हजार ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात २ हजार ७१९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह ११ हजार ८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ३१३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १८९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९४़६७ टक्के लागला आहे़ या शाखेतून १० हजार ६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यापैकी १० हजार ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ कला शाखेचा ८४़३६ टक्के निकाल लागला आहे़ वाणिज्य शाखेचा ९१़९३ टक्के तर व्यासायिक अभ्यासक्रमाचा ८४़५५ टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत यावर्षी परभणी जिल्ह्याने विभागात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे परभणीतील शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे़ तालुकानिहाय निकालामध्ये सेलू तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक आहे़ सेलू तालुक्याचा ९३़९० टक्के निकाला लागला आहे़ परभणी तालुका द्वितीय स्थानावर असून, या तालुक्याचा ९३़०४ टक्के निकाल लागला आहे. जिंतूर तालुका ९२़०३ टक्के, पूर्णा तालुका ९०़२३ टक्के, पाथरी तालुका ९०़१२ टक्के, गंगाखेड ८८़९१ टक्के, सोनपेठ ८८़८२ टक्के, पालम ८२़७७ टक्के आणि मानवत तालुक्याचा बारावीचा सर्वात कमी ७२़५१ टक्के निकाल लागला आहे़ दरम्यान बुधवारी दिवसभर शहरातील इंटरनेट कॅफे तसेच मोबाईलवरून निकालाची माहिती घेतली जात होती़यावर्षीही मुलींनीच मारली बाजीमागील काही वर्षांपासून निकालाच्या टक्केवारीत मुलांच्या तुलनेत मुली आघाडीवर आहेत़ ही परंपरा यावर्षीही खंडीत झाली नाही़ यावर्षीच्या निकालात मुलींनीच आघाडी घेतली आहे़ जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२़९४ टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाणे ८७़९७ टक्के एवढे आहे़ विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे़ त्यात परभणी तालुक्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाणे ९४़८८ टक्के (९१़९१), पूर्णा तालुक्यात ९४़३२ टक्के (८६़८८), गंगाखेड तालुक्यात ९२़४२ टक्के (८६़७०), पालम तालुक्यात ८४़६७ टक्के (८१़८२), सोनपेठ तालुका ९१़४४ टक्के (८७़०४), जिंतूर तालुका ९४़६६ टक्के (९०़४०), पाथरी तालुका ९१़९३ टक्के (८८़६२), मानवत तालुका ८०़९९ टक्के (६८़२९) आणि सेलू तालुक्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५़७३ टक्के (९२़५७) एवढी आहे़ (कंसातील आकडे मुलांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीचे आहेत़)गतवर्षीच्या तुलनेत घटला निकालबारावी परीक्षेच्या निकालात परभणी जिल्ह्याने सलग दुसºयांदा विभागात प्रथम क्रमांक मिळविला असला तरी जिल्ह्याची निकालाची टक्केवारी घटली आहे़ गतवर्षी ९०़५९ टक्के जिल्ह्याचा निकाल लागला होता़ त्यात विज्ञान शाखेचा ९५़८०, कला ८५़१८, वाणिज्य ९३़४९ आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ८७़१७ टक्के लागला होता़ यावर्षी मात्र निकालात घट झाली़
परभणी जिल्हा विभागामध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:37 AM