लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्रातून परभणी जिल्ह्याच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले़ विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले़नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी परभणी येथे कर्तव्य मेळावा घेण्यात आला़ तीन दिवसांच्या या मेळाव्यात विज्ञानाची मदत, फोटोग्राफी स्पर्धा, व्हिडीओग्राफी, अँटीसबोटेज, चेकींग, संगणक कौशल्य क्षमता, श्वान पथक स्पर्धा पार पडल्या़ त्यात परभणीसह हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यातील पोलीस संघ सहभागी झाले होते़ बुधवारी या स्पर्धेचा समारोप नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते झाला़ या स्पर्धांमध्ये परभणी जिल्ह्याच्या संघाने ६५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले़ बक्षीस वितरण कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस उपअधीक्षक सुरेश वानखेडे, जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ बुधवारी सकाळच्या सत्रामध्ये श्वान पथकाच्या स्पर्धा पार पडल्या़ त्यानंतर सायंकाळी ४़४५ वाजता प्रमुख बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रारंभ झाला़ तत्पूर्वी पोलीस संचलन करण्यात आले़ पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले़ सायंकाळी ६़३० वाजता ध्वज हस्तांतरण करण्यात आले़ बक्षीस वितरणानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे आवाहन४यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी अधिकारी, कर्मचाºयांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाºयांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा़४गुन्ह्यांची गतीने उकल करण्यासाठी आपले व्यावसायिक स्कील विकसित करावे, तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा समन्वय साधून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले़
परभणी जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:42 PM