लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला शेतकºयांनी फाटा दिला आहे. त्यामुळे तब्बल ४३ टक्के ज्वारीची पेरणी घटली असून, त्या ऐवजी हरभरा, गहू या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया परभणी जिल्ह्यातच ज्वारीचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम आहेत. खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही पिके घेतली जातात. ज्वारीचे पीक हे कमी पाण्यावर आणि हमखास उत्पादन देणारे पीक असल्याने बहुतांश शेतकरी आपल्या शेतातील काही क्षेत्र ज्वारीसाठी राखीव ठेवतात. वर्षानुवर्षापासून चालत आलेली ही परंपरा यावर्षी मात्र खंडित झाली आहे. अनेक शेतकºयांनी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला फाटा देत त्याऐवजी गहू आणि हरभºयाचे क्षेत्र वाढविले आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये यावर्षी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्र ज्वारीसाठी प्रस्तावित होते. परंतु, यावर्षी खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकºयांनी ज्वारी पेरणीला फाटा दिला.६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ ९६ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४३ टक्क्यांनी यावर्षी ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया परभणी जिल्ह्यातच यावर्षी ज्वारीचा तुटवडा भासतो की काय असा प्रश्न पडला आहे.गतवर्षी दीड लाख हेक्टरवर ज्वारीजिल्ह्यात गतवर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली होती. १ लाख ६६ हजार ६३४ हेक्टरवर ही ज्वारी घेण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये सरासरी सर्वच शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. मात्र मागील काही वर्षापासून ज्वारी ऐवजी गव्हाची मागणी वाढली आहे. तसेच शेतांमध्ये पशूशक्तीचा वापर कमी होऊन ट्रॅक्टर व इतर यंत्रांनी कामे केली जातात. त्यामुळे शेतकºयांकडील पशूधनही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. पूर्वी ज्वारीचा कडबा जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जात होता. त्यामुळे ज्वारी हमखास पेरणी जात असे. मात्र मागील काही वर्षांपासून ज्वारीला भाव कमी मिळू लागला व मजुरी, मेहनत अधिक करावी लागत असे. त्यामुळे शेतकºयांनी यावर्षी ज्वारी पेरणीकडे कानाडोळा केला आहे.तीन वर्षात प्रथमच घटले क्षेत्रजिल्ह्यात दरवर्षी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत ज्वारीची पेरणी अधिक होत असे. २०१५-१६ मध्ये १ लाख २४ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. मागील वर्षी १ लाख ६६ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षीच्या हंगामात केवळ ९६ हजार ४० हेक्टर क्षेत्रच ज्वारीसाठी वापरले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुुलनेत ज्वारीच्या पेºयात ४३ टक्क्यांनी घट झाली आहे.
परभणी जिल्ह्यात ४३ टक्क्यांनी घटले ज्वारीचे क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:19 AM