शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परभणी : जिंतूर तालुक्यात ‘मुन्नाभार्इं’चा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:50 PM

वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा हा वैद्यकीय व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य विभागानेही मागील वर्षी ५४ डॉक्टरांवर कार्यवाही केली होती. संबंधित डॉक्टरवर जिंतूर, बोरी व बामणी पोलीस स्थानकाला गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही महिने हे बोगस डॉक्टर एक तर भूमिगत झाले किंवा दवाखाना बंद करुन इतरत्र गेले होते; परंतु, मागील ६ महिन्यांपासून तालुक्यातील अनेक ठिकाणी हे बोगस डॉक्टर उघडपणे दवाखाने चालवित आहेत.शहरातील नामवंत वैद्यकीय डॉक्टरांकडे काही दिवस कपाऊंडर म्हणून काम केल्यानंतर हे कपाऊंडर सहजतेने ग्रामीण भागात जावून डॉक्टर असल्याचे भासवून सलाईन, इंजेक्शन व अ‍ॅलोपॅथिक औषधी देतात. ग्रामीण भागातील अशिक्षित व गोरगरीब जनतेला फसवून हजारो रुपये उकळतात. विशेष म्हणजे, पांढऱ्या पेशा कमी होण्यापासून ते दुर्धर आजारावरही ही मंडळी सहजतेने उपचार करतात. तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या १०० पेक्षा जास्त असून आरोग्य खात्याचे दुर्लक्ष व अर्थपूर्ण संबंध हे यास कारणीभूत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाही बोगस डॉक्टरांना पाठबळ देत असल्याचे दिसून येते. यामुळे हा व्यवसाय तालुक्यात बिनबोभाटपणे सुरु आहे.पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह४मागील वर्षी तालुक्यातील ५४ बोगस डॉक्टरांवर जिंतूर, बामणी व बोरी, चारठाणा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सोयीनुसार केला. घटनास्थळ पंचनामा, साहित्य व पुराव्याचे सखोल विश्लेषण कोर्टात दाखल करण्याऐवजी अनेक प्रकरणात पुरावे नसल्याचे कारण देऊन गुन्हा निकाली काढण्याबाबत अहवाल न्यायालयात दाखल केले. यामुळे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.बोगस डॉक्टरांना आडमार्गाचा वापरआरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसल्याने आपल्यावर कार्यवाही होते, हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेद, फिजिओथेरपी व इतर मार्गाचा अवलंब करुन प्रमाणपत्रे मिळविली असून, सहजपणे हा व्यवसाय करीत आहेत. मात्र रुग्णांना अ‍ॅलोपॅथीची औषधी दिली जाते. यामुळे रुग्णांच्या जिविताशी हा खेळ सुरु आहे.आरोग्य विभागाने फिर्याद देताना व साक्षीदार देताना काळजी घेतली नाही. फिर्यादीने आरोपींना तांत्रिकदृष्ट्या गुन्हा टिकू नये, अशी फिर्याद दिल्याने व पोलीस प्रशासनाने तपासात गोलमाल पुरावे गोळा केल्यानेच न्यायालयात गुन्हे टिकले नाहीत. शिवाय आरोपींनीही फिल्डींग लावल्याने पोलिसांनी न्यायालयात ‘क’ फायनल अहवाल दिल्यानेच कारवाई पुढे चालू शकली नाही.- मनोज सारडा, विधिज्ञ, जिंतूर५४ बोगस डॉक्टरांवर कार्यवाही केली. मात्र पोलिसांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून आपला कोणताही जबाब घेतला नाही. परिणामी अनेकांचे गुन्हे जागेवरच बंद करण्यात आले. आरोग्य खात्याने कार्यवाही केली. पण पोलिसांनी प्रकरण बंद केले.-दिनेश बोराळकर, तालुका आरोग्य अधिकारी, जिंतूरबोगस डॉक्टरांनी व्यवसाय करणे हे चुकीचे असून आरोग्य खात्याने यासाठी पुढाकार घ्यावा. संघटना म्हणून पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला तर कार्यवाहीबाबत आग्रह धरता येईल; परंतु, सर्वांचेच हितसंबंध असल्याने कार्यवाहीसाठी पुढाकार घेतला जात नाही.-शिवप्रसाद सानप, डॉक्टर असो.

टॅग्स :parabhaniपरभणीdoctorडॉक्टर