लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनांची रेलचेल पहावयास मिळाली़ वैयक्तिक पातळीवरील प्रश्नांबरोबरच सामाजिक प्रश्न आणि सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या प्रश्नांवर नागरिक, सामाजिक चळवळीतील प्रतिनिधी १४ आॅगस्ट रोजी लोकशाही मार्गाने जिल्हा प्रशासनासमोर आपले प्रश्न मांडण्यासाठी दाखल झाले़ धरणे आंदोलन, उपोषण अशी सुमारे १७ आंदोलने या ठिकाणी दिवसभरात झाली़ या आंदोलनांचा घेतलेला आढावा़पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे आंध्रा बँकेसमोर उपोषणसेलू : पीक कर्ज मिळावे, या मागणीसाठी तालुक्यातील तांदूळवाडी येथील शेतकरी सेलू येथील आंध्रा बँकेसमोर १३ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत़ तांदूळवाडी येथील जवळपास १०० शेतकºयांनी जिंतूर येथील सुंदरलाल सावजी नागरी बँकेकडून मध्यम मुदतीचे कर्ज घेतले होते; परंतु, निसर्गाच्या आवकृपेमुळे शेतकरी हे कर्ज फेडू शकले नाहीत़ ही बँक नागरी सहकारी बँक असल्याने शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही़ या बँकेने शेतकºयांच्या सातबारावर बोजा टाकला आहे़ त्यामुळे इतर बँका कर्ज पुरवठा करीत नाहीत़दत्तक असलेली आंध्रा बँक सुंदरलाल सावजी नागरी सहकारी बँकेच्या बेबाकी प्रमाणपत्राची मागणी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांना कुठलाही लाभ मिळत नाही, असा आरोप करीत शेतकºयांनी १३ आॅगस्टपासून आंध्रा बँकेच्या शाखेसमोर १३ आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे़मोबदल्यासाठी आशा वर्कर्सचे उपोषणपरभणी- आरोग्य खात्यातील शहरी आशा वर्कर्स यांचा मोबदला दहा महिन्यांपासून थकला असून, हा मोबदला तत्काळ द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर्स, गट प्रवर्तक परिचर संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले़ या आंदोलनात आशा वर्कर्ससह मुगाजी बुरुड, माधुरी क्षीरसागर, राजन क्षीरसागर, वंदना हाके, संजिवनी स्वामी आदी सहभागी झाले हाते़महामंडळ कर्ज प्रकरणाची चौकशी करापरभणी- महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे ३ आॅक्टोबर २०१७ रोजी कर्ज प्रकरणासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत हेमा कांबळे यांनी किराणा व भुसार या व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज मागणी प्रस्ताव दाखल केला आहे; परंतु, अद्यापही या कर्ज प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नाही़ महामंडळास वारंवार विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत़ त्यामुळे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून कर्ज प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी परभणी शहरातील रघुदास हाऊसिंग सोसायटी येथील चंद्रशेखर रोहिदास बनसोडे यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़शेतरस्त्याच्या मागणीसाठी उपोषणजिंतूर तालुक्यातील जांब बु़ येथील शेतकºयांनी शेतात जाण्यासाठी शेत रस्ता तयार करून देण्यात यावा, या मागणीसाठी वारंवार तालुका प्रशासनाकडे चार वर्षांपासून पाठपुरावा केला आहे; परंतु, अद्यापही या शेतकºयांना शेत रस्ता मिळाला नसल्याने या शेतकºयांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़ यामध्ये मधुकर दराडे, राजेश दराडे यांचा सहभाग आहे़‘रस्त्याचे काम थांबवा’शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील ज्ञानेश्वर नगरात नालीचे बांधकाम सुरू आहे़ मात्र या बांधकामात साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे़ याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी अर्ज केला आहे; परंतु, महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे या रस्त्याचे सुरू असलेले काम तत्काळ थांबवावून संबंधित एजन्सीवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी ज्ञानेश्वर नगरातील राजाभाऊ मुरलीधर राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़रिपाइंचे उपोषणपरभणी- पूर्णा शहरातील समता विद्यालय व सावित्री माता फुले कन्या विद्यालयातील शिक्षक भरतीची चौकशी करून शाळेची मान्यता रद्द करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे़ राज्य संघटक डी़एऩ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर सावंत, भगवान कांबळे, गंगाबाई केकान आदींचा उपोषणात सहभाग आहे़सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलनपरभणी- आरक्षण आंदोलना दरम्यान युवकांवर दाखल करण्यात आलेले गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत, मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, १५ आॅगस्टचे ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते न करता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी किंवा माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़या आंदोलनात सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले़ समाजाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात जोपर्यंत सरकार आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे़१५ आॅगस्टचे ध्वजारोहण करण्याचा अधिकार या शासनाने गमावला आहे़, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले़फेरफार लावण्याच्या मागणीसाठी उपोषणपालम- रजिस्ट्रीआधारे शेतीचा फेरफार करावा, या मागणीसाठी पालम तालुक्यातील गिरधरवाडी येथील महिला शेतकरी लक्ष्मीबाई सूरनर या पालम तहसीलसमोर १४ आॅगस्टपासून सहपरिवार उपोषणास बसल्या आहेत़रस्ता कामाच्या चौकशीसाठी उपोषणपूर्णा तालुक्यातील ताडकळस ते निळा, महागाव रस्ता दुरुस्तीच्या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी निळा येथील दिगांबर सूर्यवंशी यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़पाणंद रस्त्यासाठी उपोषणपरभणी- पूर्णा तालुक्यातील वझूर येथील शेतकºयांनी पाणंद रस्ता मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे़ नागनाथ पवार, विष्णू पवार यांच्यासह शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत़
परभणी जिल्हा कचेरी परिसर आंदोलनांनी गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:43 AM