शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

परभणी जिल्ह्यात दोन महिन्यांत ३२ टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 11:15 PM

दोन महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला़ ६ आॅगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३०़२ टक्के इतर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ त्यामुळे ६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६२़१ टक्का पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात ३२ टक्के पावसाची तूट झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला़ ६ आॅगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३०़२ टक्के इतर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ त्यामुळे ६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६२़१ टक्का पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात ३२ टक्के पावसाची तूट झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे़जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७४़६२ मिमी एवढे आहे़ परंतु, २०१२ पासून ते २०१९ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीत केवळ २०१६ मध्येच जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती़ परंतु, त्यानंतर कमी अधिक होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होवून जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटत आहे़ मागील तीन वर्षापासून पाऊस सरासरी ओलांडत नसताना यावर्षी तरी समाधानकारक पाऊस होवून जिल्ह्यातील विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना होती़ परंतु, पावसाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ परंतु, अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही़ जिल्हा प्रशासनाने पावसाच्या केलेल्या नोंदीनुसार ६ आॅगस्टपर्यंत केवळ ३०़२ टक्के पाऊस झाला आहे़ यामध्ये परभणी तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ४९़१ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २५़९ टक्के पाऊस झाला आहे़ पालम तालुक्यात ६१़५ टक्के पाऊस होणे गरजेचे असताना २९़६ टक्के पाऊस झाला आहे़ पूर्णा ७४ टक्के अपेक्षित असताना ३६़७ टक्के पाऊस झाला आहे़ गंगाखेड ६५ टक्के अपेक्षित असताना ३१़२ टक्के पाऊस झाला़ सोनपेठ ६९ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३३़३ टक्के पाऊस झाला आहे़ सेलू ५१़५ टक्के पावसाची गरज असताना केवळ २४़६ टक्के पाऊस झाला आहे़ पाथरी तालुक्यात ५७़२ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २७़५ टक्के झाला आहे़ जिंतूर तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ६१ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३१़१ टक्के पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर मानवत तालुक्यात ७२़२ टक्के पाऊस अपेक्षित असताना केवळ ३४़५ टक्के पाऊस झाला़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी पाहता आतापर्यंत ६२़१ टक्के पाऊस होणे गरजेचे असताना केवळ ३०़२ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षीही ३२ टक्के पावसाची तूट दिसून येत आहे़ त्यामुळे भविष्यात चाºयाचा प्रश्न, पाणीटंचाई भेडसावणार आहे तर दुसरीकडे ज्या शेतीवर शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन असते ते सुद्धा बिघडणार आहे़सहा वर्षांत दोनदाच ओलांडली सरासरी४जिल्ह्यातील मागील सहा वर्षातील वार्षिक पर्जन्यमानाचा विचार केला असता, केवळ २०१३ व २०१६ मध्ये जिल्ह्याची ७७४़६२ मिमी वार्षिक सरासरी ओलांडून पाऊस झाला होता़ त्यानंतर मात्र एकदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नाही़ यामध्ये २०१२ मध्ये केवळ ६३८़४ मिमी पाऊस झाला होता़ २०१३ मध्ये पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावत सर्वाधिक ८८०़८८ मिमी पाऊस झाला होता़ त्यानंतर २०१४ मध्ये केवळ ३५८़६१ मिमी, २०१५ मध्ये ३४०़४६ मिमी पाऊस झाला़४२०१६ मध्ये वार्षिक सरासरी ओलांडत ८२६़४८ मिमी, २०१७ मध्ये ५३५़६१ मिमी तर २०१८ मध्ये ४८२़५१ मिमी पाऊस झाला होता तर यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन महिने उलटले आहेत़ आतापर्यंत ३७६़८३ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ २३३़९१ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे किमान यावर्षी तरी पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरी ओलांडून आभाळाकडे डोळे असलेल्या बळीराजाला आनंद द्यावा, अशी अपेक्षा आहे़चौदा प्रकल्पांना पाण्याची आस४परभणी जिल्ह्यातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविणाºया जिल्ह्यातील १४ प्रकल्पांना गतवर्षीपासून पाण्याची आस लागली आहे़४जिल्ह्यासह मराठवाड्याचे वैभव असणाºया जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण, करपरा मध्यम प्रकल्प, वडाळी प्रकल्प, कवडा प्रकल्प व मांडवी प्रकल्प, सिद्धेश्वर प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही़४सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्प, गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प, मुळी बंधारा, पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा, पाथरी तालुक्यातील मुदगल व ढालेगाव बंधारा, मानवत तालुक्यातील झरी तलाव, पालम तालुक्यातील तांदूळवाडी प्रकल्प ही चौदा प्रकल्पांना गतवर्षीपासून पाण्याची आस आहे़४हे प्रकल्प दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरले नाहीत़ त्यामुळे सिंचनाच्या प्रश्नांसह पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना झगडावे लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प