लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात २० सप्टेंबर रोजी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदानासह ओढे- नदी, नाले खळखळून वाहिले. २१ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.९९ मि.मी. पाऊस झाला.जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यात खंड स्वरुपात पडणाºया पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चिंता वाढविल्या होत्या. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील १४ लघु, मध्यम प्रकल्पासह नदी, नाले कोरडेठाक होते; परंतु, ३१ आॅगस्टपासून जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्याच बरोबर मासोळी, येलदरी या प्रकल्पांसह पूर्णा, दुधना, गोदावरी या प्रमुख नद्या खळखळत्या झाल्या. २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सरासरी ३७.५९ मि.मी. पाऊस झाला. त्याच बरोबर २१ सप्टेंबर रोजी प्रशासनाने तालुकानिहाय पर्जन्य अहवालात सरासरी २१.९९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद केली आहे. त्यानुसार परभणी तालुक्यात १३.८८, पालम १२.३३, पूर्णा १६, गंगाखेड ६.५०, सेलू २८.२०, पाथरी ६१.६७, जिंतूर १९.६७ तर मानवत ३९.६७ मि.मी. पाऊस झाला आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठही तालुक्यात शनिवारी पहाटेपर्यंत धो-धो पडणाºया पावसाने सोनपेठ तालुक्याकडे मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले. या तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी पाऊसच झाला नाही. सेलू तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देऊळगाव मंडळात दमदार पाऊस झाला. तालुक्यातील देऊळगाव मंडळात सर्वाधिक ६५ मि.मी. पाऊस झाला, तर सेलू मंडळात ३५ मि.मी., कुपटा मंडळात २३ मि.मी., वालूर मंडळात ९ मि.मी. तर चिकलठाणा मंडळात ९ मि.मी. पाऊस झाला. पालम तालुक्यात शुक्रवारी रात्री १ तास झालेल्या पावसामुळे उसाचे पीक आडवे झाले आहे. तर कापसाच्या पिकालाही फटका बसला आहे. २१ सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती.घडोळी कोल्हापुरी बंधाºयात पाणीयेलदरी- शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदीवर असलेल्या घडोळी येथील कोल्हापुरी बंधाºयात मोठे पाणी साचले होते. पूर्णा नदीवर तीन कोल्हापुरी बंधारे असून त्यापैकी हिवरखेड येथील बंधारा तुडुंब भरला आहे.जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी४परभणी- जिल्ह्यातील ४ महसूल मंडळांत शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाली. त्यामध्ये सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात ६५ मि.मी., पाथरी महसूल मंडळात १०५ मि.मी. तर हादगाव मंडळात ६५ मि.मी. आणि मानवत महसूल मंडळात ६७ मि.मी. पाऊस झाला.पूर्णा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस४तालुक्यातील पाच मंडळांत २० सप्टेंबर रोजी काही भागात रिमझिम तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तालुका व परिसरात रात्री ९ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पूर्णा मंडळात ७ मि.मी., ताडकळस ५, चुडावा २४, लिमला ८ तर कात्नेश्वर मंडळात ३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.चार तास वाहतूक बंद४मानवत- २० सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या पावसामुळे कोल्हा- कोथाळा रस्त्यावर असलेल्या धरमुडा नदीला पूर आला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक चार तास बंद होती. त्याच बरोबर चार गावांचा संपर्कही तुटला होता. तसेच सोमठाणा- आटुळा रस्त्यावरील नदीलाही पूर आल्याने गावात जाणाºया रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने गावातील रहदारी बंद झाली होती. त्याच बरोबर कोल्हावाडी गावाला जाणाºया रेल्वेपुलाखाली रस्त्यावर ७ फुटांपर्यंत पाणी साचले होते.४तालुक्यातील मानवत, कोल्हा व केकरजवळा या तिन्ही मंडळांत सरासरी १०७ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या स्टोअर रुमची भिंत कोसळली. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.पाथरी शहरातील रस्त्यांवर तीन फूट पाणी४शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्र्यंत पाथरी मंडळात १०५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक नाल्यातील पाणी रस्त्यावरुन वाहिले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नाल्यातील पाणी मोंढा परिसरातील रस्त्यावर आल्याने २ फुटांवरून पाणी रस्त्यावरुन वाहू लागले.४त्याच बरोबर आयटीआयकडे जाणाºया रस्त्यावर तीन फूट पाणी आले होते. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. शहरासह तालुक्यातील पाथरगव्हाण परिसरातील सिमेंट बंधारे तुडुंब भरले होते. पाथरी- मानवत रस्त्यावरील रत्नापूर जवळील नदीला पूर आला होता.४जायकवाडीच्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आहे. त्यातच दोन दिवसांपासून पडणाºया पावसाचे पाणी गोदावरी पात्रात दाखल झाले. परिणामी ढालेगाव बंधाºयातून २ दरवाजांवाटे १३ हजार ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. मुद्गल बंधाºयाचेही दोन दरवाजे उघडले होते.
परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:15 AM