शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परभणी : अतिवृष्टीने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:12 AM

जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला असून खरीप हंगामातील पिकांचे अक्षरश: नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात येणारी पिके शेतातच सडू लागली आहेत. ज्या पिकांच्या भरवशावर दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. तीच पिके निसर्गाने हिरावून घेतली आहेत.सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांना नगदी पीक म्हणून पाहिले जाते. खरीप हंगामातील ही पिके दिवाळीपूर्वी बाजारपेठेत येतात आणि या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळतो. यावर्षी पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणीही एक महिना उशिराने झाली आहे. हे सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसाने पिकांची नासाडी केली आहे.आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. शुक्रवारी दिवसभर आणि रात्री जिल्हाभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात पालम तालुक्यात ६७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ३६.७६, पूर्णा ६३.६०, गंगाखेड ४४.२५, सोनपेठ ३१, सेलू ४७.६०, पाथरी २७, जिंतूर १८.१७, मानवत २८.६७ असा जिल्हाभरात सरासरी ४०.४५ मि.मी. पाऊस झाला आहे.शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्याने वार्षिक सरासरीही ओलांडलीही आहे. जिल्ह्यात आतापर्यत ७७७ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. एवढी आहे. परभणी तालुक्यात ६१६, पालम ८७३, पूर्णा ८९६, गंगाखेड ७४७, सोनपेठ ६९६, सेलू ८०५, पाथरी ९१८, जिंतूर ६१४ आणि मानवत तालुक्यात ८२५ मि.मी. पाऊस झाला.शनिवारीही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी कोसळल्या. रात्रीच्या सुमारास आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली असून शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दरम्यान, पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर्णा नदीसह छोट्या नद्यांना पूर आला आहे. पूर्णा- ताडकळस मार्गावरील पिंगळगड या छोट्या नदीला पूर आल्याने शनिवारी दुपारी ३ वाजेपासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पालम तालुक्यात १२५ टक्के पाऊसवार्षिक सरासरीच्या तुलनेत पालम तालुक्यामध्ये १२५ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात १११ टक्के, गंगाखेड १०७ टक्के आणि पाथरी तालुक्यामध्ये ११९ टक्के व मानवत तालुक्यात १०१ टक्के पाऊस झाला. तर परभणी ७१ टक्के, सोनपेठ ९९ टक्के, सेलू ९८ टक्के आणि जिंतूर तालुक्यामध्ये केवळ ७५ टक्के पाऊस झाला आहे.७ मंडळांमध्ये अतिवृष्टीशुक्रवारी रात्री ७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सेलू तालुक्यातील सेलू मंडळात ९८ मि.मी., पालम तालुक्यातील चाटोरी मंडळात ८९ मि.मी., पालम मंडळात ७२ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात ६५, चुडावा मंडळात ७२, लिमला मंडळात ६९ आणि ताडकळस मंडळात ६९ मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी