शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

परभणी: कार्यारंभ आदेशाअभावी रखडली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:39 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड  (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़गंगाखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रोहयो अंतर्गत वैयक्तीक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकूल योजना, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, निर्मल शोष खड्डे, शौचालय, तुती लागवड, शेततळे, ढाळीचे बांध, फळबाग, व्हर्मीकम्पोस्ट, नाडेप कम्पोस्ट आदी कामांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते़यामध्ये २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंत सिंचन विहिरीचे ४७३, विहीर पुनर्भरणाचे १४६, निर्मल शोष खड्डे २४८, पंतप्रधान घरकूल योजनेचे १ हजार ५५, शौचालय ९८, जिल्हा रेशीम विभागाच्या तुती लागवडचे १२०, ढाळीचे बांध २४, फळबाग ८६, व्हर्मी कम्पोस्ट ५७०, नाडेप कम्पोस्ट ७१३ आदी कामांचा समावेश होता़यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत मोजक्याच कामांना मंजुरी देण्यात आली होती़ वरील यंत्रणांमार्फत चालणाऱ्या रोजगार हमीच्या कामांना पंचायत समिती कार्यालयातून अद्यापही कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने मंजूर झालेली कामे कागदोपत्रीच आहेत़रोजगार हमी योजनेंर्गत मंजूर झालेल्या विविध भागांच्या ३ हजार १३३ कामांना संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन मंजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे़तालुक्यातील अपूर्ण कामे संथ गतीनेगेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकूल योजनेतील अपूर्ण असलेल्या २७८ घरकुलांच्या कामांपैकी २१५ कामेच सुरू करण्यात आली आहेत़ या घरकुलांच्या कामांवर ८६० मजूर कार्यरत आहेत़ तसेच गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या ५५३ सिंचन विहिरींपैकी १८ विहिरींच्या कामांवर २४८ मजूर तर शोष खड्ड्यांच्या २८ कामांवर ३२० मजूर असे एकूण १४२८ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत़ त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड, रोपवाटीका या कामांवर ७२ मजूर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्हा रेशीम उद्योग विभागाच्या तुती लागवड व किटक संगोपनाच्या १२ कामांवर ८५ मजूर कार्यरत असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले़ मात्र ही सर्व कामे कागदोपत्री असल्याचाच आरोप जॉबकार्डधारक व ग्रामस्थांमधून केला जात आहे़मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊतालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील मजुरांनी कामांची मागणी केल्यास मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून दिली जातील, त्याचबरोबर मजुरांनी इतरत्र स्थलांतर न करता कामाच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावेत़ गावातील पाणी गावातच मुरून पाणीटंचाईवर करण्यासाठी तसेच डास निर्मूलनासाठी शोष खड्ड्यांचे प्रस्तावही दाखल करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी