शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

परभणी : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:29 PM

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती़ त्यामुळे या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करीत शासनाकडून कामे मंजूर करून घेतली़ जवळपास एक वर्षापासून या रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशही मिळाले; परंतु, परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर, आर्वी फाटा ते गोविंदपूर वाडी, कुंभारी बाजार ते कारला आदी गावांतील रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे़ मंगळवार, बुधवारी पावसाच्या सरी कोसळल्या़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़ येत्या महिनाभरात या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर या मार्गावरील गावांचा संपर्क तुटणार आहे़ त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच वाहनधारकांचीही मोठी गैरसोय होणार आहे़ गेल्या सात-आठ महिन्यांपासून या रस्त्यांची कामे सुरू असताना अद्यापही संबंधित गुत्तेदारांकडून ही कामे पूर्ण करण्यात आली नाहीत़ ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागाकडे रस्त्यांची कामे जलदगतीने करावेत, यासाठी तक्रारी केल्या; परंतु, याचे कोणतेही सोयरसूतक बांधकाम विभागाला नसल्यामुळे येत्या पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होणार आहे़ त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली व अर्धवट असलेली कामे तत्काळ पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला आदेशित करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे; परंतु, आतापर्यंतचा बांधकाम विभागाची कार्यपद्धती पाहता ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़महामार्गाचीही कामेही मंदगतीनेच४जिल्ह्यातील परभणी-गंगाखेड, परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी- वसमत या चारही महामार्गाची कामे सद्यस्थितीत अर्धवट अवस्थेत आहेत़४पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत़४त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूकही पूर्णत: कोलमडणार आहे़ परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत पाहत आहे़४त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्याला जोडणाºया महामार्गांचीच कामे अपूर्ण असतील तर ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत न बोललेच बरे़४विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक