लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यात चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुधन सांभाळायचे कसे, या विवंचनेत पशुमालक हवालदिल झाले असूून जनावरांच्या बाजारात मिळेल त्या भावात पशुधनाची बेभाव विक्री केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.चालू वर्षात तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपातील पिके हातची गेली व रबी हंगामात पेरणीच झाली नाही. पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील मुळी बंधारा, मासोळी प्रकल्प ही मोठी धरणे व लहान, मोठे तलाव कोरडे राहिल्याने भर हिवाळ्यात भूजल पातळीने तळ गाठला. त्यामुळे विहीर, बोअर या जलस्त्रोतांचे पाणी आटले. तालुक्यातील बहुतांश गावात जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गंगाखेड तालुक्याचा मोठा भाग डोंगरपटट््यात असल्याने व काही भाग गोदावरी नदीकाठचा असल्याने गोदा काठावरील गावे वगळता डोंगरपट्यातील गावात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाची पिके हातची गेली. रबी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी या पिकांबरोबर चारा पिकावर असलेली शेतकºयांची आशा ही परतीच्या पावसाने दगा दिल्याने मावळली. चाºयाचे उत्पन्न झाले नसल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले. हातची पिके गेल्याने हातात पैसा शिल्लक राहिला नाही. यामुळे महाग झालेल्या चारा खरेदी करणे पशुपालकांना अशक्य झाल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ येत आहे. चारा, पाण्याअभावी जनावरांची झालेली अवस्था पाहावत नसल्याने पशुपालकांनी आपले पशुधन बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. बाजारात पशुधनाला भावच नसल्याने मिळेल त्या भावात पशुधन विक्री केल्या जात असल्याचे चित्र जनावरांच्या बाजारात पहावयास मिळत आहे. दरम्यान, जनावरे जगविण्यासाठी पशुपालक दिवसभर राना, वनात भटकंती करून जनावरे जगवित आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यात गावा गावात शासनाच्या उपाययोजना राबवून चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.चाºयाचे भाव वधारले४तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या कडब्याला ३ हजार रुपये शेकडा भाव देऊन कडबा मिळत नाही. यामुळे पशुमालक १८०० रुपये टनाने ऊस, १ एकर शेतातील सोयाबीनची गुळी १२०० रुपयांप्रमाणे खरेदी करून पशुधन जगविण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत तालुक्यात चारा छावण्या उपलब्ध करून चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मगणी होत आहे.
परभणी : चारा, पाणीटंचाईमुळे पशुपालक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:40 AM