लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक भागातील पाणी टंचाई कमी झाली नसून, ३५ टँकरच्या साह्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे. विश्ेष म्हणजे, नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने मनपाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात परभणी शहरासह जिल्ह्यातचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. मागील चार महिन्यांपासून शहरात १५ ते २० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नवी योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही. तर जुनी योजना अपुरी ठरत आहे. परिणामी टंचाईमध्ये भर पडली आहे.जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उन्हाळ्यात अनेक भागातील हातपंप आटले. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागली. जलवाहिनी नसलेल्या भागात पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यातच शहरात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा करण्यात आला. संपूर्ण उन्हाळ्यात मनपाला ४४ टँकर लावावे लागले. १ जूनपासून प्रत्यक्ष पावसाळ्याला सुरुवात झाली आहे.पावसाळ्याचा एक महिना उलटला तरीही शहरातील पाणी टंचाई हटली नाही. परिणामी टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. सद्यस्थितीत शहरात एकूण ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात प्रभाग समिती अ मध्ये ८, प्रभाग समिती ब मध्ये ९ आणि प्रभाग समिती क मध्ये १३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय मनपाच्या मालकीचे १३ टँकर सुरू आहेत. एकंदर शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई अद्यापही कमी झाली नसून मनपाला टंचाईग्रस्त भागास अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.मनपाच्या सूचनांना दिला फाटा४शहरात १२ हजार लिटर आणि सहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला़ किरायाने टँकर लावताना संबंधित टँकरवर परभणी शहर महापालिका मोफत पाणीपुरवठा असे ठळक अक्षरात लिहावे, असे बंधनकारक करण्यात आले होते़ परंतु, अजूनही बहुतांश टँकरवर हा फलक आढळत नाही़ ज्या टँकरवर परभणी मनपाच्या नावाने फलक नाही अशा टँकरवर कारवाई देखील झाली नाही़ त्यामुळे मोफत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली काहींनी आपला खिसाही गरम करून घेतल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात ८० टँकर सुरूच४जिल्ह्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती़ जिल्हा प्रशासनाने १०९ टँकरच्या सहाय्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़४परंतु, समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई देखील कायम असून, सद्यस्थितीला ८० टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा केला जात आहे़टँकरवर राहिले नाही नियंत्रण४शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे टँकर सुरू करण्यात आले़ हे टँकर सुरू करताना प्रत्येक टँकर समवेत मनपाचा एक कर्मचारीही देण्यात आला होता़ मात्र संपूर्ण उन्हाळ्यात या टँकरवर मनपातील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले़४टँकर चालकांना पाणी वाटपासाठी पॉर्इंटही निश्चित करून दिले होते़ मात्र अनेक भागांत नेमून दिलेल्या पॉर्इंटवर पाण्याचे वाटप झाले नाही़ ज्या भागातून अधिकची रक्कम मिळते त्याच ठिकाणी अधिक पाणी वाटप होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.४त्यामुळे नोंदणी केलेल्या ठिकाणापेक्षा इतर ठिकाणीही पाण्याचे वाटप झाल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे.
परभणी :पावसाळ्यातही ३५ टँकर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:01 AM