मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकºयांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकºयांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीज पुरवठा मिळावा, या हेतुने २०१२ मध्ये वीज वितरण कंपनीच्या वतीने ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यात वीज जोडणीसाठी शेतकºयांचा अर्ज मंजूर होताच तातडीने वीज जोडणी देण्याचे काम महावितरणचे होते. त्यासाठी कोटेशन भरण्यात आले आणि जोडणी देताना मात्र मुख्य वाहिनीपासून शेतकºयांच्या शेतापर्यंत खांब टाकणे, तारा ओढणे ही कामे करण्यास महावितरणने उदासिनता दाखविली. त्यामुळे अनेक शेतकºयांना साहित्यांचा खर्च उचलून तात्पुरती जोडणी घ्यावी लागली. परभणी जिल्ह्यात सहा वर्षामध्ये ८ हजार ३७३ शेतकºयांनी ‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी अर्ज केले.या सर्व शेतकºयांचे अर्ज मंजूर होऊन प्रति शेतकरी ५ ते ६ हजार रुपये कोटेशन भरुन घेण्यात आले. त्यामुळे या योजनेतून साधारण ५ कोटी रुपये महावितरणच्या खात्यात जमा झाले. मात्र जोडणी देण्यासाठी शेतकºयांना कोटेशन भरुनही साहित्य खर्च उचलावा लागला. त्यामुळे शेतकºयांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या योजनेचा मोठा फटका शेतकºयांनाच बसला आहे. कारण २०१२ पासून महावितरणने ८ हजार शेतकºयांच्या कृषीपंपाची वीज जोडणी अधिकृत करुन घेतली. मात्र महावितरणने या शेतकºयांना येणाºया वीज समस्या सोडविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांना आजही महावितरण कार्यालयाकडे वीज जोडणीसाठी चकरा माराव्या लागत आहेत; परंतु, याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी साफ दुर्लक्ष केले आहे.योजनेत सहभागी झालेले शेतकरी वीज जोडणी का मिळत नाही, असा सवाल अधिकाºयांना केल्यानंतर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून वीज वितरण कंपनीच्या वतीने लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात अधिकाºयांनी कोणतेच स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ८ हजार शेतकºयांमध्ये महावितरण कंपनीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन कारवाईसाठी तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे.पाच कोटी जमा असूनही निधी नसल्याचे दिले जातेय् कारणशासनाने ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना २०१२ साली सुरु केली. या योजनेत जिल्ह्यातील ८ हजार ३७३ शेतकºयांनी सहभाग घेतला. या शेतकºयांकडून वीज जोडणीच्या नावाखाली तब्बल पाच कोटी रुपयांचे कोटेशन भरुन घेतले. मात्र या योजनेतून शेतकºयांना देण्यात येणाºया साहित्यासाठी कोणताही निधी आजपर्यंत देण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकºयांचे कोटेशन भरुन कृषीपंपाची वीज जोडणी अधिकृतपणे करुन घेण्यात आली. त्यांना बिलेही अदा करण्यात आली. शासनाकडून निधी प्राप्त होताच या योजनेतून शेतकºयांना लागणारे साहित्य तत्काळ दिले जाईल, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ६ वर्षे उलटले तरी शेतकºयांना हे साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे येत्या काळात साहित्य मिळेल की नाही, याची खात्री शेतकºयांना नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने कोटेशनच्या नावाखाली जमा केलेल्या पाच कोटी रुपयांतून शेतकºयांना वीज जोडणीचे साहित्य पुरवठा करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.आठ कोटी रुपये मिळूनही उपयोग होईनाजिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंपाच्या वीज जोडण्यांची कामे पूर्ण करण्यासाठी वीज वितरण कंपनीला वरिष्ठस्तरावरुन आठ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीमधून जिल्ह्यातील केवळ हजार ते बाराशे शेतकºयांना वीज जोडण्या मिळणार आहेत. त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत ८ हजार ३७३ व वीज जोडणीसाठी वैयक्तिक प्रस्ताव दाखल केलेले जवळपास ३ हजार असे एकूण ११ हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आठ कोटी रुपये मिळूनही उपयोग होईना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.उपविभागनिहाय शेतकरीवीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो. महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गतही या दहा उपविभागातून तब्बल ८ हजार ३७३ शेतकºयांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये पाथरी उपविभागातून १ हजार ७१६, सेलू १ हजार ६०५, जिंतूर १ हजार ५८५, गंगाखेड ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, सोनपेठ ५१३, पालम ५४६, मानवत उपविभागातील ४११ वीज ग्राहकांचा समावेश आहे.
परभणी :आठ हजार शेतकरी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:25 AM