लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : डासाळा आणि गुगळी धामणगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत सेलू शहराचा वीज पुरवठा बंद राहिल, अशी आक्रमक भूमिका ४ गावांतील ग्रामस्थांनी घेत सेलू शहराचा वीज पुरवठा बंद करण्यास भाग पाडले़ त्यामुळे सेलू शहराचा दोन तास वीज पुरवठा बंद राहिला़ परिणामी शहरवासियांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले़गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे डासाळा व धामणगाव ३३ केव्ही उपकेंद्राच्या लाईनवर मोठा बिघाड झाला. त्यानंतर अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. या दोन केंद्रांतर्गत येणाऱ्या डासाळा, लाडनांद्रा, म्हाळसापुर, मालेटाकळी, गुगळी धामणगाव, कुंडी, झोडगाव, डिग्रस आदी गावांचा तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे या गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली़ तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यातच वाढलेला उकाडा आणि डासांच्या प्रादुभार्वाने या गावातील ग्रामस्थ हैराण झाले होते. शनिवारी रात्री १० वाजता अचानक काही गावातील ग्रामस्थ सेलू येथील पावर हाऊस येथे जमले. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत बिघाड दुरुस्ती लवकर होत नसल्याने जोपर्यंत आमच्या गावातील वीज पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत सेलू शहराचा वीजपुरवठा बंद राहील, अशी भूमिका घेतली. परिस्थिती पाहून शहराची रात्री १० वाजता वीज बंद करण्यात आली. त्यामुळे अगोदरच उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांची झोप उडाली. जवळपास दोन तास हा गोंधळ सुरू होता. अखेर महावितरणच्या अधिकाºयांनी ग्रामीण भागातील बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शहराची रात्री १२ वाजता वीज पुरवठा सुरू करण्यात आला़ दरम्यान, ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला तर सेलू शहराचाही वीज पुरवठा बंद करून शहरवासीयांना वेठीस धरल्याचा प्रकार पहिल्यांदा घडला. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर रविवारी दिवसभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. दरम्यान, पाथरी येथून सेलूला येणाºया स्वतंत्र लाईनला आमच्या ही उपकेंद्राला जोडा अशी मागणी ग्रामस्थानी केली. त्यानंतर महावितरण ने सेलूच्या लाईन वर जोडणी केली; पंरतू दोन्ही लाईन बंद झाल्या. शेवटी जुन्याच लाईन चा बिघाड सापडल्यावर दोन्ही लाईन वर वीज सुरू झालीपहिल्याच वाºयात : वीज गायबसेलू तालुक्यातील डासाळा आणि गुगळी धामणगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत १० ते १२ गावांना वीज पुरवठा केला जातो़ या गावांना पाथरी येथून जुन्या लाईनद्वारे वीजपुरवठा केला जातो़ गुरुवारी झालेल्या वादळी वाºयाने जुन्या लाईनमध्ये बिघाड झाली़ परिणामी दोन दिवस ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागली़ वीज वितरण कंपनीकडून वारंवार दुरुस्ती करूनही पहिल्याच वाºयात वीज बिघाड झाल्याने वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे़४ व ५ एप्रिल रोजी रात्री वादळी वाºयामुळे डासाळा व धामणगाव उपकेंद्रात बिघाड झाला. नेमका बिघाड सापडत नव्हता. महावितरणचे कर्मचारी त्याच कामात होते. बिघाड दुरूस्त केल्यानंतर शनिवारी रात्री १़३० वाजता दोन्ही उपकेंद्रांची वीज सुरळीत करण्यात आली. सेलू शहरासाठी पाथरीहून स्वतंत्र लाईन आहे. त्यामुळे शहराचा वीज पुरवठा सुरळीत होता. तर गुगळी धामणगाव व डासाळा हे दोन्ही उपकेंद्र पाथरीहून येणाºया जुन्या लाईनवर आहेत, त्याच लाईनवर बिघाड झाला होता.-राजेश मेश्राम, उपविभागीय अभियंता महावितरण, सेलू
परभणी: सेलू शहराची वीज 'त्या' ग्रामस्थांनी केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:10 PM