लोकमत न्यूज नेटवर्कलिंबा (परभणी) : बाभळगाव शिवारातील टॉवरजवळ विजेची तार तुटल्याने लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे.लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांना बाभळगाव येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. चारही गावास वीजपुरवठा करणारी वीज वाहिनी ३५ वर्षांपूर्वीची असून, विजेचे खांबही जागोजागी वाकले आहेत. वीजतारा जीर्ण झाल्याने नेहमी तुटत आहेत. परिणामी ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पाथरी-सोनपेठ, रस्त्याच्या बाजूला बाभळगाव शिवारात टॉवरजवळ मुख्य वाहिनीची तार तुटून पडली. यामुळे तारूगव्हाण, लिंबा, आनंदनगर तांडा, लिंबा तांडा येथील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.दोन दिवसानंतरही महावितरणच्या कर्मचाºयांनी दुरुस्तीचे काम केले नाही. तारूगव्हाण, लिंबा व लिंबा तांडा येथील शेतकºयांसाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले आहे; परंतु विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी आणखीच अडचणीत सापडले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी बाभळगाव येथील गट क्र. २१८ मधील सुरज गिराम यांचा दोन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाला होता. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी रमेश गिराम, जयश्री गिराम यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे; परंतु, याकडेही महावितरणच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. लिंबा येथील शेख मुस्ताक हे दुरुस्तीच्या मागणीसाठी बाभळगाव येथील उपकेंद्रामध्ये दिवसभर थांबले. मात्र, कर्मचारीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे किरकोळ दुरुस्तीअभावी वरील चारही गावांतील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढण्याची वेळ आली आहे.
परभणी : चार गावांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:49 AM