लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये रविवारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली़ शिवाय बँकाही सुरू होत्या़३१ मार्च रोजी २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपणार असल्याने या दिवशी विविध शासकीय योजनांच्या निधी खर्चाचा आढावा व शिल्लक राहिलेल्या निधीचे समर्पण करण्याची प्रक्रिया शासकीय अधिकाऱ्यांना पूर्ण करावी लागते़त्या अनुषंगाने ३१ मार्च रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, भूमीअभिलेख कार्यालय, कोषागार अधिकारी कार्यालय आदी शासकीय कार्यालयांमध्ये तसेच प्रशासकीय इमारत परिसरातही कर्मचाºयांची गर्दी दिसून आली़रविवारी सकाळी १० पासून रात्री ८ वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात बसूनच होते़ दुसरीकडे आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध राष्ट्रीयकृत बँका सुरू असल्याचेही पहावयास मिळाले़ या बँकांमध्ये शासकीय निधीच्या अनुषंगाने विविध व्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली़४जिल्हा कचेरीतील कोषागार अधिकारी कार्यालयात रविवारी कामकाज झाले़ जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क साधत येथील कर्मचारी शेवटच्या टप्प्यातील कामकाज करीत असल्याचे दिसून आले़
परभणी: मार्चएंडमुळे शासकीय कार्यालयात रविवारीही कर्मचाऱ्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:07 PM