लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गरिमा रियल इस्टेट अॅन्ड अलाईड आणि गरिमा होम्स अॅन्ड हाऊसेस लिमिटेड या दोन कंपन्यांनी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.गरिमा या कंपनीच्या वतीने वेगवेगळे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या या तक्रारीवरून बोरी, नवामोंढा आणि पूर्णा या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले असून फसवणुकीचा आकडा १ कोटी रुपयांच्या घरात आहे.तक्रारीनुसार या कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूक रकमेचा परतावा म्हणून दामदुप्पट, दीडपट रक्कम देण्याचे अमिष दाखविण्यात आले. परताव्याच्या किंमतीचे अॅग्रीमेंट घेऊन महाराष्टÑात कोणत्याही ठिकाणी जागा नावावर करण्यात येईल, असे बॉन्डवर लिहून देण्यात आले. या अमिषामुळे अनेकांनी गुंतवणूक केली; परंतु, मुदत संपल्यानंतरही परतावा किंवा गुंतवणूकदाराच्या नावे प्लॉट दिला नाही. कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊ लागल्या. आतापर्यंत तीन गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखेमार्फत केला जात आहे. तपासामध्ये तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या अडीच हजारांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.गुंतवणूकदारांना पोलिसांचे आवाहन४गरिमा रियल इस्टेट अॅन्ड अलाईड लिमिटेड व गरिमा होम्स अॅन्ड हाऊसेस या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही परतावा न मिळाल्याने फसवणूक झालेल्या परभणी येथील गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.४परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील तिसरा मजला रूम नंबर २११ येथील आर्थिक गुन्हा शाखेत १२ नोव्हेंबरपासून तक्रारदारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनीने दिलेला बॉन्ड, आधारकार्डाची सत्यप्रत व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावेत.४२०११ पासून परभणी जिल्ह्यात या दोन्ही कंपन्या कार्यरत होत्या. या कंपन्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे दाखल असून पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळाची माहिती मिळविली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे साक्षीदारांची तपासणी केली जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक जी.बी. दळवी यांंनी सांगितले.
परभणी : २५०० गुंतवणूकदारांना फसविल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:55 PM