लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत परभणी शहरातील सराफा बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. गतवर्षीच्या तुुलनेत यावर्षी सोन्याच्या खरेदीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची प्रथा आहे. दरवर्षी या मुहूर्तावर दागिने खरेदीला ग्राहकांची गर्दी होते. मागील काही वर्षात जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सराफा व्यवसायही अडचणीत सापडला होता. मागील वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी या व्यवसायात फारशी उलाढाल झाली नाही. मात्र यावर्षी सोने खरेदीसाठी सराफा दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. परभणी शहरात साधारणत: ३५० सराफा व्यावसायिक आहेत. या सर्व दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.
परभणी : पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:52 AM