लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या होणाऱ्या प्रचाराचा खर्च त्या त्या उमेदवारांच्या निवडणुकीतील एकूण खर्चात समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिली़विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण दाखल अर्जांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ४ आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वरील माहिती दिली़ सोशल मीडियातून अनेक जण प्रचाराच्या पोस्ट टाकत असून निवडणूक विभाग यावर काय कारवाई करीत आहे? याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर म्हणाले, सोशल मीडियातून प्रचार करण्यासाठी उमेदवारांना निवडणूक विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे़ मात्र अशी परवानगी न घेता प्रचार होत असेल तर त्यावर निवडणूक विभागाची नजर राहणार असून, सोशल मीडियातील प्रचाराचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे़ जिल्ह्यात निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली आहे़ आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसएसटी पथकाने आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत़ त्यात जिंतूर तालुक्यात ७ आणि गंगाखेड तालुक्यातील ३ गुन्ह्यांचा समावेश आहे़ त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री संदर्भात कारवाया केल्या असून एकूण ४९ गुन्हे दाखल केले आहेत़ त्यात ४१ आरोपींना अटक केली असून, १ जार ९७० लिटर दारु जप्त केली असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली़ जिल्ह्यात ५६ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केले असून, क्षेत्रीय अधिकाºयांच्या सर्वेक्षणानंतर काही केंद्रांची वाढ केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले़ विविध कारणांमुळे मतदानावर बहिष्कार टाकणाºया गावातील मतदारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे़ या उपरही मतदानावर बहिष्कार टाकणाºया ग्रामपंचायतींचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी कपात करावा, अशी शिफारस निवडणूक विभागाकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ़ संजय कुंडेटकर यांची उपस्थिती होती़तीन निरीक्षक परभणीत दाखल४विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २ जनरल निरीक्षक आणि १ पोलीस विभागाचे निरीक्षक शुक्रवारी परभणीत रुजू झाले़ त्या विजयकेतन उपाध्याय हे ओरिसा राज्यातून आले असून, त्यांच्यावर सर्वसाधारण निरीक्षक म्हणून गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे़४तर पंजाब राज्यातून आलेल्या भूपेंदरसिंग हे जिंतूर आणि परभणी विधानसभा मतदार संघासाठी जनरल निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत़ तर राजस्थान येथून आलेले अजयसिंग हे चारही विधानसभा मतदार संघासाठी पोलीस विभागाचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत़१२ लाखांचा मुद्देमाल जप्त४आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, य ासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे़४जिल्ह्यात आतापर्यंत ६०७ प्रतिबंधक कारवाया केल्या असून, अवैध दारू विरोधातील ३४ केसेस केल्या आहेत़ त्यात १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़४१०३ आरोपंविरूद्ध गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी दिली़ त्याच प्रमाणे पाच जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे़४५६३ शस्त्र जमा केल्याचेही त्यांनी सांगितले़ निवडणूक काळात परवानगीशिवाय ड्रोन कॅमेºयांचा वापर करणे हा गुन्हा असून, जिंतूरमध्ये रॅलीत ड्रोन कॅमेरा वापरल्या प्रकरणी गुन्हा नोंदविल्याचेही उपाध्याय यांनी सांगितले़
परभणी: सोशल मीडियावरील प्रचार उमेदवारांच्या खर्चात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:58 AM