लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची विमा रक्कम देताना कंपनीने आखडता हात घेतल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या पिकांचा विमा उतरविण्यासाठी पुढाकार घेत आहे; परंतु, नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम ही तुटपुंजी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे़यावर्षी शेतकºयांनी इफ्को टोकीयो या विमा कंपनीकडे आपले पिके संरक्षित केली होती; परंतु, शेतकºयांना अपेक्षित विमा रक्कम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांना मदत मिळाली आहे, त्या शेतकºयांच्या खात्यावर अद्यापही या विमा कंपनीने रक्कम वर्ग केली नाही़त्याचबरोबर हजार रुपयांपासून रक्कम मिळत असल्याने नुकसान भरपाईच्या तुलनेत सदरील रक्कम खूपच कमी असल्याची भावना शेतकºयांतून व्यक्त होत आहेत़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़गतवर्षीचेही भिजत घोंगडे४जिल्ह्यातील शेतकºयांना गतवर्षीही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा रक्कम देताना तोंडाला पाने पुसली आहेत़४त्यामुळे याहीवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते की, अशी भीती व्यक्त होत आहे़
परभणी : पीकविम्याच्या कमी रकमेने शेतकरी मोठ्या संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:01 AM