शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

परभणी :अ‍ॅपद्वारे होणार पिकांचे सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:01 AM

जिल्ह्यातील पीक परिस्थिती संदर्भातील सत्यमापणासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता वापरण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय समितीला मंगळवारी जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत दिले आहेत. या संदर्भातील अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :  जिल्ह्यातील पीक परिस्थिती संदर्भातील सत्यमापणासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता वापरण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय समितीला मंगळवारी जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत दिले आहेत. या संदर्भातील अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील पीक परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी मंगळवारी टंचाई निवारणार्थ तसेच पीक परिस्थितीच्या अनुषंगाने महसूल, कृषी, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांनी ३ आ़ॅक्टोबर रोजी पाठविलेल्या दुष्काळ मूल्यांकनाबाबतच्या पत्राच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर या बैठकीत सद्यस्थितीत जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती काय आहे, त्याबाबतचा आढावा घेतला. तसेच हंगामातील पिकांची कापणी होण्यापूर्वी सर्व्हेक्षण करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र सुदूर संवेदन यंत्रणा (एमआरएसएसी) यांच्या मार्फत सत्य मापणासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. तथापि तुर्तास पीक विमा योजनेंतर्गत पीक कापणी प्रयोगाकरीता वापरण्यात येणाºया अ‍ॅपचा वापर करुन सर्व्हेक्षण करण्यात यावे, हे अ‍ॅप (ल्लूाू.ॅङ्म५.्रल्ल) या वेबलिंकवर उपलब्ध आहे. अशा क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र व सर्व्हेक्षण करण्यात येत असलेल्या क्षेत्राचे, ठिकाणाचे (ॠढर ूङ्म-ङ्म१्िरल्लं३ी) येथील अशा पद्धतीने मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने छायाचित्रे घेण्यात यावीत. सदर ठिकाणचे व पिकांची छायाचित्रही संगणक प्रणालीमध्ये नंतरच्या विश्लेषणासाठी अपलोड करण्यायोग्य राहतील, याची दक्षता घ्यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. २८ जून २०१८ च्या शासन निर्णयानुसार या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तामार्फत शासनाला व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीला २० आॅक्टोबर रोजी पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे १५ आॅक्टोबरपर्यंत क्षेत्रीयस्तरावरील सत्यमापन समितीतील मंडळ कृषी अधिकारी, पं.स. कृषी अधिकारी व महसूलचे मंडळ अधिकारी या तीन सदस्यांनी आपला अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या तालुकास्तरीय समितीकडे  सादर करावा. तालुकास्तरीय समितीने रॅडम  पद्धतीने प्रत्येक महसूलातील एका मंडळातील एका गावाची पडताळणी करुन एकत्रित अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडे  सादर करावा, असे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी बैठकीत सांगितले.दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सत्यमापणाकरीता तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये गावांची निवड, प्रमुख पिकांची निवड व प्लॉटची निवड हे टप्पे राहणार आहेत. त्यात टप्पा १ व टप्पा २ या मूल्यांकनाअंती दुष्काळ संभाव्यता असलेल्या तालुक्यातील एकूण गावांपैकी १० टक्के गावांची रॅडम पद्धतीने निवड करावी, यासाठी तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी अद्याक्षरानुसार करण्यात यावी व कृषी विभागाच्या रॅडम पुस्तकातील गट, सर्व्हे नंबर निवडण्याकरीता वापरायचे आकडे या तक्त्याचा वापर करुन संपूर्ण गावातून १० टक्के गावांची निवड यादी करावी, असे ही या संदर्भात कृषी आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पिकांची निवड करीत असताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील प्रमुख पीक ठरविण्याच्या व्याख्येनुसार गावच्या एकूण पीक पेरणी झालेल्या क्षेत्राच्या किमान २५ टक्के ज्या पिकांचे क्षेत्र आहे, असे पीक प्रमुख पीक म्हणून संबोधण्यात यावे, असेही आदेशित करण्यात आले आहे. सर्व्हे नंबरची निवड करताना प्रमुख पीक हे एक एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याबाबत खात्री करावी, एक एकरपेक्षा जास्त प्रमुख पिकाखालील सर्व्हे/ गटनंबर निवडावा, क्षेत्र कमी असल्यास सदरील सर्व्हे नंबर रद्द करुन रॅडम पद्धतीने दुसरा सर्व्हे नंबर निवडावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नुकसानीची पातळी या आधारे ठरविणार...केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीची पातळी ठरविताना विचारात घ्यावयाच्या काही बाबी ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पीक पेरणी झाल्यानंतर ओलाव्याअभावी उगवणीवर झालेला परिणाम, शाकीय वाढीवर झालेला परिणाम, पीक फुलोºयावर येण्याची अवस्था व शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेत ओलाव्याअभावी झालेला परिणाम व त्यामुळे उत्पादनात येणारी तुट, पिकास पाते लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असल्याने पाण्याच्या ताणामुळे उत्पादनावर झालेला परिणाम, प्रति झाड असलेल्या कापसाच्या बोंडाची संख्या आदी सर्व बाबी नुकसानीची पातळी ठरविताना विचारात घेतल्या जाणार आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाonlineऑनलाइनRevenue Departmentमहसूल विभाग