लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): शेतकºयांना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकºयांनी १२ डिसेंबरपासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेने शेतकºयांच्या कर्ज वाटपासाठी अनेक फाईली घेतल्या; परंतु, अद्यापपर्यंत ही प्रकरणे निकाली काढली नाहीत. या प्रश्नावर यापूर्वी आंदोलनही करण्यात आली; परंतु, बँकेचे व्यवस्थापक टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकºयांनी यापुर्वी हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवार पासून बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. भाकपचे विजय कोल्हे, ज्ञानोबा शेळके, रामेश्वर ननेर, आबासाहेब दळवे, नवनाथ कोल्हे, मुंजाभाऊ लिपणे आदींसह शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत.
परभणी : कर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:30 AM