लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विद्युत रोहित्र दुरुस्तीचा महावितरणच्या स्थानिक अधिकाºयांनी घातलेला घोळ शेतकरी व नागरिकांच्या अंगलट आला असून, शहरातील महावितरणने निविदा काढून नियुक्त केलेल्या ७ पैकी तब्बल ४ विद्युत रोहित्र दुरुस्तीचे कारखाने बंद आहेत़ तरीही याबाबतची माहिती या अधिकाºयांनी वरिष्ठ कार्यालयास दिली नसल्याची बाब समोर आली आहे़जिल्ह्यात सद्यस्थितीत गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यामुळे शेतकरी अगोदरच हैराण झाले आहेत़ अशातच शेतीसाठी व पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाºयाची व्यवस्था करताना सर्वांच्याच नाकी नऊ येत आहेत़ त्यामुळे या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांमधील अधिकाºयांनी संवेदनशील होणे आवश्यक आहे; परंतु, काही विभागातील अधिकाºयांकडून मात्र सातत्याने कोडगेपणाची भूमिका घेतली जात आहे़ परभणीतील महावितरण कंपनीचाही असाच काहीसा अनुभव शेतकºयांना येऊ लागला आहे़ ग्रामीण भागात विजेची मागणी वाढल्याने व तांत्रिक बिघाडामुळे विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे़ नवीन विद्युत रोहित्र जिल्ह्याला लवकर उपलब्ध होत नसल्याने नादुरुस्त झालेले विद्युत रोहित्र तातडीने महावितरण कंपनीने दुरुस्त करून देणे आवश्यक आहे़; परंतु, या विभाातील काही अधिकाºयांची सकारात्मक मानसिकता नसल्याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसत आहे़ जिल्ह्यात सद्यस्थितीत १६१ विद्युत रोहित्र जळाले आहेत़ या विद्युत रोहित्रांची दुरुस्ती महावितरण कंपनीने निविदा काढून नियुक्त केलेल्या पॉवर कंट्रोल, हिंगोरा ट्रान्समीटर, पंकज ट्रान्समीटर, पॉवर इंजिनिअर्स, बापूजी लघु उद्योग, वसंतमेघ ट्रान्समीटरर्स आणि नेहा ट्रान्समीटर्स या ७ कंपन्यांकडून नियमितपणे केली जाते़ या सातही कंपन्यांचे काम चालू असल्यास विद्युत रोहित्र दुरुस्तीला गती मिळू शकते़ परिणामी शेतकºयांचा विद्युत रोहित्राचा प्रश्न सुटू शकतो; परंतु, तसे होताना दिसून येत नाही़ ७ पैकी पॉवर इंजिनिअर्स, बापूजी लघुउद्योग ट्रान्समीटर, वसंतमेघ ट्रान्समीटर आणि नेहा ट्रान्समीटर या ४ कंपन्या सद्यस्थितीत बंद आहेत़ त्यामुळे उर्वरित तीन कंपन्यांकडून रोहित्र दुरुस्त करून घेताना वेळ लागत आहे़ दररोज ७ ते ८ रोहित्राची दुरुस्ती या कंपन्यांकडून केली जात आहे़ त्यातील लगेच ३ ते ४ लगेच नादुरुस्त होत आहेत़ सद्यस्थितीत १६१ रोहित्र नादुुरुस्त आहेत़ ज्या गतीने या तीन कंपन्या दुुरुस्तीचे काम करीत आहेत, त्यानुसार जवळपास एक महिना या १६१ विद्युत रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे़ विशेष म्हणजे या चार कंपन्या बंद असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी वरिष्ठांना दिली नाही़ खा़ बंडू जाधव यांनी मुंबई येथे महावितरणच्या प्रकाशगड या मुख्य कार्यालयास ७ डिसेंबर रोजी घेराव आंदोलन केले होते़ त्यावेळी झालेल्या चर्चेत खा़ जाधव यांनी ही बाब महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या निदर्शनास आणून दिली़ त्यानंतर संजीवकुमार यांनी महावितरणच्या स्थानिक अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते़ शिवाय यानिमित्ताने स्थानिक अधिकाºयांनी दडवून ठेवलेली माहिती मुंबईत उघड झाली़ त्याचा फटका मात्र जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना सहन करावा लागला़ आता तरी बंद असलेले विद्युत रोहित्र दुरुस्तीचे कारखाने सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़शेतकºयांना : आर्थिक भुर्दंडविद्युत रोहित्र नादुरुस्तीचे वाढलेले प्रमाण सप्टेंबर महिन्यापासून कायम आहे़ परंतु, हा प्रश्न सोडविण्यास स्थानिक अधिकाºयांकडून फारसे प्राधान्य देण्यात आलेले नाही़ विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतातील पीक पाण्याअभावी वाळतील, या चिंतेतून शेतकºयांना इतर ठिकाणाहून रोहित्राची दुरुस्ती करून आणावी लागत आहे़ परिणामी अधिकची रक्कम त्यांना मोजावी लागत आहे़ ही संधी काही स्वार्थी व्यक्तींकडून साधली जात आहे़ त्याच्यातूनही विद्युत रोहित्र दुरुस्तीला वेळ लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत़दुरुस्ती साहित्याचाही तुटवडारोहित्रांच्या दुरुस्तीसाठी प्रामुख्याने किटकॅट, केबल, लक्झर आदी साहित्याची आवश्यकता असते़ या साहित्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे विद्युत रोहित्र वेळेवर दुरुस्त होत नाहीत़ शिवाय विद्युत रोहित्रासाठी लागणाºया आॅईलचाही सातत्याने तुटवडा जाणवतो़ परिणामी विद्युत रोहित्र वेळेवर दुरुस्त व कार्यान्वित होत नाहीत़ असे असतानाही महावितरणच्या अधिकाºयांकडून या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जात नाही़ परिणामी दुष्काळी स्थितीमध्ये टंचाईत भर पडत आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे आवश्यक आहे़
परभणी :रोहित्र दुरुस्तीचा घोळ शेतकऱ्यांच्या अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:01 AM