लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी ) : महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पालम तालुक्यात वीजपुरवठा बिघाड आता नेहमीचाच झाला आहे़ अधिकारी अजूनही याकडे गांभिर्याने पाहत नाहीत. शेतकरी व लोकप्रतिनिधींनी वारंवार ओरड करूनही महावितरणाचा कारभार सुधारलेला नाही. दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या शेतकºयांना याचा दुहेरी फटका बसत आहे.कृषीपंपाना वीजपुरवठा करणारे दहा ते बारा रोहीत्र आतापर्यंत जळून खाक झाले आहेत. देयके भरल्याशिवाय नवीन रोहीत्र दिले जात नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने रोहीत्र जळत आहेत. तसेच वीजपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने कृषीपंपही जळत आहेत. तालुक्यात मोठी ओरड होऊनही महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच आहे. यामुळे शेतकºयांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे़३३ केव्ही प्रस्ताव : अडगळीत४विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे ताळमेळ बसत नसल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. पालममधील केंद्रांना वीज भार सहन होत नसल्याने लपंडाव सुरू झाला आहे. पेठशिवणी येथे १३३ केव्ही केंद्रांचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. त्यामुळे विजेची समस्या गंभीर बनली आहे.एकाच अभियंत्यावर भारपालम कार्यालयात तीन अभियंत्याची गरज आहे. पण सध्या केवळ उपअभियंता व्ही.डी. स्वामी एकटेच कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच सर्व भार पडत आहे. दिवसभर वीज ग्राहकांच्या समस्या ऐकण्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे़परभणीच्या अधिकºयांची मनमानीशेतकरी देयके भरून रोहीत्र परभणी येथे घेऊन येत आहेत. मात्र या ठिकाणी अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू असून, रोहीत्रासाठी आठ -आठ दिवस चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके वाळून जात आहेत.
परभणी : वीज समस्यांमुळे शेतकरी वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:25 AM