शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

परभणी : उपोषणार्थ्याला आली भोवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:34 AM

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान एका उपोषणार्थ्याला बुधवारी दुपारी भोवळ आल्याचा प्रकार घडला़ त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान एका उपोषणार्थ्याला बुधवारी दुपारी भोवळ आल्याचा प्रकार घडला़ त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे़परभणी व हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांचे सहा महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे़ वेळोवेळी मागणी करूनही वेतनाची पूर्तता केली जात नाही़ विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत निधी उपलब्ध आहे़ तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार गटसचिवांच्या वेतनासाठी १ टक्के अनुदान जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले आहे़ असे असतानाही गटसचिवांचे वेतन मात्र थकल्याने गटसचिवांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ दरम्यान, या प्रश्नी दोन्ही जिल्ह्यातील गटसचिवांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे़या उपोषणार्थींची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही़ उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपोषणार्थीपैकी परभणी, हिंगोली गटसचिव कर्मचारी संघटना पतसंस्थेचे चेअरमन एकनाथ लक्ष्मणराव जाधव (रा़ वडगाव ता़ गंगाखेड) यांना अचानक भोवळ आली़ त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांची प्रकृती आता सुधारत आहे़ या प्रकारानंतरही गटसचिवांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे़प्रशासनाचे गटसचिवविरोधी धोरणपरभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील गटसचिवांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप गटसचिवांनी केला आहे.परभणी जिल्ह्याला संस्था सक्षमीकरण निधी १ कोटी २० लाख रुपये प्राप्त झाला असून, या निधीतून मागील सहा महिन्याच्या वेतनापैकी तीन महिन्यांचे थकीत वेतन करावे तसेच कर्जमाफीतून आलेल्या ८६ कोटी रुपयांच्या २ टक्के प्रमाणे होणाऱ्या निधीतून सहा महिन्यांच्या चालू वेतनापैकी चार वेतनासाठी लागणारा निधी उभा करुन गटसचिवांच्या वेतनाविषयी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी गटसचिवांनी केली आहे.परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील गटसचिव तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. बुधवारी सकाळी एका गटसचिवाला भोवळ आल्याने गटसचिवांनी प्रशासनाविषयी चांगलाच रोष व्यक्त केला.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल