शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

परभणी: २३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:46 PM

येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून, सोमवारी निकाल हाती येणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून, सोमवारी निकाल हाती येणार आहे़परभणी महानगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली़ प्रभाग ३ ड या जागेसाठी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ तर प्रभाग क्रमांक ११ अ या जागेसाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ २३ जून रोजी सकाळी ७़३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला़ प्रभाग क्रमांक ३ मध्ये १८ मतदान केंद्रावर तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये एकूण १५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले़ दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली़प्रभाग क्रमांक ३ मध्ये एकूण १३ हजार ५८८ मतदारांपैकी ६ हजार ९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ त्यात ३ हजार १३० महिला तर ३ हजार ८६६ पुरुष मतदारांनी मतदान केले़ ५१़४९ टक्के मतदान झाले आहे़ प्रभाग क्रमांक ११ अ या जागेसाठी २१ हजार ३३५ मतदारांपैकी ५ हजार ५५० मतदारांनी (४८.९६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला़ त्यात २ हजार ४४२ महिला मतदारांनी तर ३ हजार १०८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव, भगवान यादव, सहाय्यक लेखाधिकारी राठोड, नगरसचिव विकास रत्नपारखे, बाळासाहेब मोरे, मंजूर हसन, करुणा स्वामी, परमेश्वर पारधे, साहेबराव पवार आदींनी प्रयत्न केले़परभणी येथील कल्याण मंडपम्मध्ये सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून, साधारणत: एक ते दीड तासांत निकाल हाती येईल, अशी अपेक्षा आहे.सोनपेठमध्ये ७४़९७ टक्के मतदानच्सोनपेठ- येथील नगरपालिकेच्या सदस्याच्या एका जागेसाठी २३ जून रोजी झालेल्या पोट निवडणुकीत ७४़९७ टक्के मतदान झाले़ सोमेश्वर मंदिर दहीखेड प्रभाग १ ब च्या रिक्त जागेसाठी रविवारी दोन केंद्रांवर मतदान घेण्यात आले़ १ हजार ५४२ मतदारांपैकी १ हजार १५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़च्त्यात ५८१ पुरुष तर ५७५ महिला मतदारांनी मतदान केले़ या पोट निवडणुकीत निर्मला सोमनाथ चव्हाण, आश्रोबा रामराव चिकणे, भगवान बापूराव किरवले, लक्ष्मण पंडित खरात, राजकन्या सुनील रंजवे, सुशील बालासाहेब सोनवणे या सहा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे़ सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे़नगराध्यक्षपदासाठी ५८़८५ टक्के मतदानलोकमत न्यूज नेटवर्कमानवत : येथील नगराध्यक्ष पदासाठी २३ जून रोजी २१ केंद्रांवर मतदान पार पडले़ सायंकाळी ५़३० वाजेपर्यंत ५८़८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती सहाय्यक निवडूक निर्णय अधिकारी उमेश ढाकणे यांनी दिली़ २४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे़नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ७़३० ते सायंकाळी ५़३० या वेळेत मतदान पार पडले़ एकूण २६ हजार १५७ मतदारांपैकी १५ हजार ३९५ मतदारांनी मतदान केले़ त्यात ७ हजार ९६ महिला मतदार तर ८ हजार २९९ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ सकाळी ९़३० वाजेपर्यंत ९़७६ टक्के मतदान झाले होते़ त्यानंतर मात्र हळूहळू मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली़ एकूण ५८़८५ टक्के मतदान झाले आहे़भाजपाचे उमेदवार प्रा़ एस़एऩ पाटील, काँग्रेसच्या उमेदवार पूजा खरात, अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे़२४ जून रोजी सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे़ दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येईल, अशी अपेक्षा आह़े़ मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश ढाकणे यांनी प्रयत्न केले़ पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका