लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरी नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुळी येथे ११.३५ दलघमी क्षमतेचा निम्न पातळी बंधारा बांधला आहे. ८९ कोटी २८ लाख रुपये या कामावर खर्च झाले. मात्र अद्यापपर्यंत या बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही. २०११ मध्ये बंधाºयाचे काम पूर्ण झाले. त्यावेळी ५.७२ दलघमी पाणीसाठा करण्यात आला. २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. मात्र यावेळी प्रायोगिक तत्वावर बसविलेल्या २० स्वयंचलित दरवाजांपैकी १६ दरवाजांना हानी पोहचली आणि बंधाºयातील संपूर्ण पाणी वाहून गेले होते. त्यानंतर २०१३ आणि २०१४ मध्ये काही प्रमाणात पाण्याची साठवण करण्यात आली. २०१५ पासून पाऊस झाला नसल्याने बंधारा कोरडाच आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर आलेल्या पुरात या बंधाºयात ११.३५ दलघमीपेक्षा अधिक पाणी आल्याने दरवाजे निखळून पडले व ते पाण्याने वाहून गेले. त्यामुळे आता बंधाºयातील पाणी वाहून जात असल्याने या बंधाºयात उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पाहणी देखील केली. बंधाºयावर उचल पद्धतीचे दरवाजेच बसविणे योग्य राहील, असा प्रस्तावही तयार करण्यात आला. तो गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत या कामाला प्रारंभ झाला नाही. परिणामी बंधाºयात पाणीसाठा होत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी पात्रात पाणी दाखल झाले आहे; परंतु, हे पाणी वाहून जात आहे.१७०५ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायममुळी येथील बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास गंगाखेड तालुक्यातील ८ गावांमध्ये १४७५ हेक्टर आणि सोनपेठ तालुक्यातील तीन गावांमध्ये २३० हेक्टर अशी १७०५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र बंधाºयात पाणीसाठाच होत नसल्याने या शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायम आहे. जलसंपदा विभागाने बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.कागदोपत्री धूळफेकमुळी येथील बंधाºयाचे दरवाजे बंद नसल्याने या बंधाºयात पाणीसाठाच होण्याचा प्रश्न येत नाही. मात्र पाटबंधारे विभागाने मुळी बंधारा १०० टक्के भरल्याची कागदोपत्री दाखवून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी याविषयी संताप व्यक्त केला.
परभणी : मुळीचा बंधारा कोरडा राहण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:02 AM