लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहरातील श्रीराम कॉलनी व परिसरात महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडास जेरबंद करण्यास सिल्लोड येथील पथकाला शनिवारी यश आले़ माकड पिंजºयात बंद झाल्यानंतर हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़श्रीराम कॉलनी परिसरात एक महिन्यापासून एक लाल तोंडाचे माकड वास्तव्यास होते़ या माकडाने परिजात कॉलनी व श्रीराम कॉलनीत दहशत निर्माण केली होती़ खाद्य पदार्थ खाण्यासाठी माकड थेट घरात घुसत होते़ हुसकावण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या अंगावर धावून जात होते़ तसेच लहान मुलांना मारहाण करीत असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले होते़ याच परिसरातील एका महिलेवर या माकडाने हल्ला करून डोळ्याला गंभीर इजा केली होती़त्यानंतर वन विभागाने माकडाला फळातून औषधी देऊन पकडण्याचा प्रयत्न केला़ परंतु, माकड त्यांच्या हाती लागले नाही़ दिवसेंदिवस माकडाचा उपद्रव वाढत गेल्याने नागरिक चिंतेत होते़ उपविभागीय अधिकाºयांनी उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करण्याची सूचना वन विभागाचे अधिकारी भंडारे व नरवाडे यांना केली़ त्यानंतर सिल्लोड येथील समाधान गिरी व संदीप गिरी यांच्या पथकाने शनिवारी श्रीराम कॉलनी व परिसरात पिंजरा लावून उपद्रवी माकडाला पकडण्याची तयारी सुरू केली. सायंकाळच्या सुमारास माकडाला पिंजºयात बंद करण्यात आले़दरम्यान, उपद्रवी माकडाने श्रीराम कॉलनी तसेच परिजात कॉलनीत धुमाकूळ घालून महिलांना चावा घेण्याचा सपाटा लावला होता़ तर लहान मुलांचे केस ओढून घरात घुसत असल्याने नागरिक हैराण झाले होते़ शहरातील कन्या शाळा परिसरातील अन्य एका उपद्रवी वानरालाही या पथकाने पकडले़
परभणी : ...अखेर उपद्रवी माकडास केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:10 AM