लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र त्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी न झाल्याने मानवत व पाथरी तालुक्यातील १७५५ शेतकºयांच्या खात्यावर राज्य शासनाकडून १ कोटी ७६ लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.मानवत येथे विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने फेब्रुवारी २०१८ या महिन्यात मानवत व पाथरी तालुक्यासाठी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रावर ३१८४ शेतकºयांनी हमी भावाने तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. राज्यातील खरेदी केंद्र मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून १५ मे २०१८ रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ मेपर्यंत यातील केवळ ८४४ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली होती. राज्य शासनाने आॅनलाईन नोंदणी केलेल्या, मात्र माल खरेदी न झालेल्या शेतकºयांसाठी प्रती क्विंटल १ हजार रुपयाप्रमाणे अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान हेक्टरी १० हजार रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त २ हेक्टरसाठी २० हजार रुपये या प्रमाणात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रनिहाय अनुदानास पात्र शेतकºयांच्या याद्या संबंधित तहसीलदारान्ाां सादर करून प्रमाणित करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मानवत येथील खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी तब्बल २३४० शेतकºयांची तूर खरेदी शिल्लक होती. यापैकी १४३ शेतकºयांना एसएमएसद्वारे माल विक्रीस आण्याची सूचना करून देखील त्यांनी माल न आणल्याने या शेतकºयांना अनुदान यादीतून वगळले जाणार आहे. तसेच खरेदी शिल्लक राहिलेल्या २१९७ शेतकºयांपैकी काही शेतकºयांची नावे २ वेळेस आल्याने वगळण्यात आले. येथील केंद्रावर २००६ शेतकरी अनुदानास पात्र ठरले होते. यापैकी २५ मार्चपर्यंत १७५५ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ७६ लाख २४ हजार ९०५ रुपये जमा करण्यात आले आहेत. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी २५१ शेतकºयांच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसल्याने अशा खात्यावर अनुदान जमा करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. अशा शेतकºयांना खरेदी विक्री संघाच्या वतीने संपर्क साधून आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करण्याची सूचना केली जात आहे. तब्बल एक वर्षानंतर शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे.शेतकºयांना दिलासाज्या शेतकºयांची तूर हरभरा विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी झालेली होती; परंतु, मुदतीत खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही खरेदी होऊ शकली नाही, अशा शेतकºयांना १० क्विंटलपर्यंत १ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून ५ मे २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती.या संदर्भातही धिम्या गतीने यंत्रणा काम करत आहे. या अनुदानाकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या होत्या. आता हक्काची रक्कम शेतकºयांना मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.हरभरा अनुदानाची प्रक्रिया सुरुयाच केंद्रावर गतवर्षी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या मात्र खरेदी न झालेल्या शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून काही शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे. विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे अनुदान पात्र शेतकºयांची यादी उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे खरेदी विक्री संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ३६२ हरभरा उत्पादक शेतकºयांना अनुदान मिळाले असल्याची माहिती खरेदी विक्री संघाने दिली.
परभणी :अखेर तुरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:48 PM