लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने परभणी शहरातील कुर्बान अली शाह नगर येथे नुकतेच वित्तीय आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक प्रबंधक प्रवीण सिंधकर, नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक प्रितम जंगम, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक हट्टेकर, महिला आर्थिक महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी निता अंबोरे, कार्यक्रमाधिकारी प्रकाश दवणे, व्यवस्थापक जयश्री टेहरे, लेखापाल वर्षा मोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी सिंधकर, जंगम, हट्टेकर, अंबोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्यमेव जयते महिला बचत गटाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची पाहणी प्रमुख पाहुण्यांनी केली. यावेळी बचतगटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोगीनी तारामती गायकवाड यांच्यासह बचतगटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
परभणी: वित्तीय आर्थिक साक्षरता प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:32 AM