लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील डिग्रस येथील पूर्णा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करीत असताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने एक बोट जप्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन जिंतूर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील डिग्रस येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी स्वत: दोन वेळेस या धक्यावर कार्यवाही केली. पहिल्या वेळेस आढळून आलेली बोट जाग्यावरच उद्धस्त करण्यात आली होती. दुसºयावेळी मिळून आलेली बोट जप्त करून पोलिसांत जमा करण्यात आली. दोन मोठ्या कारवायानंतरही या ठिकाणच्या वाळूमाफियांनी वाळू चोरी सुरुच ठेवली. ४ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधे यांनीही अशीच कारवाई करीत बेवारस बोट जप्त केली होती. यानंतर वाळूमाफियांनी वाळू चोरी थांबविली, असे वाटत होते; परंतु, २६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी पारधी, तहसीलदार सुरेश शेजूळ, मंडळ अधिकारी बोधले, तलाठी हनवते, अव्वल कारकून नागेश देशमुख यांच्या पथकाने डिग्रस येथील पूर्णा नदीपात्रात धडक कारवाई करीत अवैध वाळू उपसा करणारी एक बोट जप्त केली. त्याच बरोबर तेथे असलेल्या दोन व्यक्तीना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकाच ठिकाणी चार बोटी जप्ततालुक्यातील डिग्रस जवळील पूर्णा नदीपात्र हे वाळूमाफियांसाठी सोन्याची खाण बनले आहे. या ठिकाणी प्रशासनाने कितीही कार्यवाही केली तरीही वाळू चोरी सुरुच आहे. विशेष म्हणजे डिग्रस येथे आतापर्यंत एका वर्षात ४ वेळा बोटी जप्त करण्यात आल्या. एवढे होऊन सुद्धा वाळू चोरी मात्र जोरात सुरू आहे.वाळू चोरी प्रकरणातील दोघे अटकेत४डिग्रस येथील वाळू धक्यांवर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी २६ एप्रिल रोजी कार्यवाही करीत बोट जप्त केली.४या प्रकरणी तलाठी गोविंद हनवते यांच्या फिर्यादीवरून जिंंतूर पोलिसात आरोपी नवनाथ काशिनाथ घुगे, नामदेव ज्ञानेश्वर गिते, गोविंद मारोतराव घुगे, रामचंद्र लक्ष्मण घुगे या चौघांविरुद्ध वाळू चोरी प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.४यातील नवनाथ घुगे, नामदेव गिते यांना पोलिसांनी अटक केली असून गोविंद घुगे व रामचंद्र घुगे हे फरार आहेत.काही पोलीस कर्मचारीही वाळू चोरीत सहभागीवझर येथील धक्यातून वाळू चोरणारे पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी आहेत. त्यांची वाहने या भागातून चालतात. ही वाहने नातेवाईकांच्या नावावर असून पोलिसांचे वाहन असल्याने कार्यवाही करण्याची धमक प्रशासनात दिसत नाही. प्रशासन झारीतील शुक्राचार्याना आवरेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच बरोबर तालुक्यामध्ये वाळू चोरी करणारे राजकीय पक्षाचे प्राबल्य असणारे नेते, कार्यकर्ते आहेत. प्रशासन राजकीय पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी साधारण व्यक्तीवर गुन्हे दाखल करून दिखावा करीत असल्याचे दिसत आहे.वझर धक्यावर प्रशासनाची मेहर नजरतालुक्यातील वझर बु. येथील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. या ठिकाणी पूर्वी असलेली वाळू चोरीची जागा बदलून दोन कि.मी. पुढे वाळू चोरीचे ठिकाण शोधले जाते. उसवद या लिलाव झालेल्या वाळू धक्याच्या नावाखाली चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. प्रशासन डिग्रसला कार्यवाही करीत असताना वझरवर मात्र मेहरनजर का करीत आहे? याबाबत उलटसूलट चर्चा होत आहे. तर दुसरीकडे राजकीय पाठबळामुळेच वाळू चोरी तालुक्यातील वझर व डिग्रस या वाळू धक्यावरून सुरू असल्याचेही नागरिकातून बोलल्या जात आहे.तालुक्यातील डिग्रस येथील वाळू धक्यावरील बोट जप्त केली आहे. प्रशासन आता वझर येथे होणाºया वाळू चोरीकडे लक्ष घालणार आहे.-उमाकांत पारधी,उपविभागीय अधिकारी, जिंतूर
परभणी : डिग्रस येथील वाळू धक्यातून बोट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:38 AM