लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अर्ध्याच कर्मचाºयांवर या कार्यालयाची भिस्त आहे़ जिल्हा प्रशासनाने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे़जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चालना देणे, मत्स्यबीज उपलब्ध करून देणे अशी कामे या कार्यालयामार्फत केली जातात़ विशेष म्हणजे परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्याचा कार्यभार या कार्यालयातून पाहिला जातो़ मात्र कार्यालयातील अर्धे पदे रिक्त आहेत़ परभणी येथे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय कार्यरत आहे़ या ठिकाणी एकूण १४ पदे मंजूर असून, त्यापैकी ७ पदे रिक्त आहेत़ रिक्त पदांमध्ये सहाय्यक आयुक्त, मत्स्य विकास अधिकारी, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आणि मस्त्यक्षेत्रिक ही ४ पदे रित आहेत़ परभणीत मत्स्य क्षेत्रिक ही चार पदे मंजूर असून, चारही रिक्त आहेत़सहाय्यक मत्स्य विकास अधिकाºयाच्या २ पैकी १ पद रिक्त आहे़ मत्स्य विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांचे प्रत्येकी १ पद मंजूर असून, ही दोन्ही पदे रिक्त आहेत़सहाय्यक अधिकाºयांकडे पदभारमत्स्य व्यवसाय विभागात वर्ग १ आणि वर्ग २ ची दोन्ही पदे रिक्त असल्याने या दोन्ही पदांचा पदभार सहाय्यक मत्स्य विकास अधिकाºयांकडे आहे़ विशेष म्हणजे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी हे पद तांत्रिक स्वरुपाचे असून, या पदावरील अधिकाºयांना तांत्रिक कामांबरोबरच प्रशासकीय कामाचा भारही सहन करावा लागत आहे़सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत मत्स्य व्यवसायाला चालणा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होणे गरजेचे आहे़ मात्र रिक्त पदांमुळे मत्स्य व्यवसाय ठप्प पडला़
परभणी : निम्म्याच कर्मचाऱ्यांवर चालते मत्स्य कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:49 AM